Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ‘आंदोलनाशी संबंधित व्यक्तींनी आयुक्तांच्या विरोधात…’; संजय निरुपमांचा निशाणा

Sanjay Nirupam: महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद करत निरुपम यांनी समाजातील तरुणांचे रोजगार, आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांचे प्रश्न दुर्लक्षित करता येणार नसल्याचे सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 23, 2026 | 09:15 PM
तरुणांच्या भावनांना भडकवणे सोपे मात्र, नेतृत्वासाठी अनुभव आवश्यक

तरुणांच्या भावनांना भडकवणे सोपे मात्र, नेतृत्वासाठी अनुभव आवश्यक

Follow Us
Follow Us:
  • तरुणांच्या भावनांना भडकवणे सोपे मात्र, नेतृत्वासाठी अनुभव आवश्यक
  • शिक्षक-पदवीधर निवडणुकांत थेट संपर्क निर्णायक
  • पेपरफुटीविरोधातील आंदोलनाला जनसमर्थन, राजकीय मुद्द्यांकडे वळल्यानंतर प्रतिसाद घटल्याचा दावा
पुणे/Sanjay Nirupam:  तरुणांच्या भावनांना आवाहन करून त्यांना आंदोलनासाठी एकत्र आणणे सोपे असते, मात्र, त्यांना योग्य दिशा देऊन सक्षम नेतृत्व उभे करणे हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी केवळ सोशल मीडियावरील लोकप्रियता किंवा आंदोलनाची लाट पुरेशी ठरत नाही, तर अनुभव, संघर्ष, अभ्यास आणि आत्मपरीक्षण आवश्यक असते, असे मत (Pune) शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी व्यक्त केले. निरुपम यांनी ‘नवभारत-नवराष्ट्र’च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी तरुणांची बदलती मानसिकता, राज्यातील राजकीय घडामोडी, मराठा आरक्षण आणि शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांवर भाष्य केले.

तरुणांच्या आंदोलनांचा संदर्भ देताना निरुपम यांनी नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि अनियमिततांविरोधात झालेल्या आंदोलनाचा उल्लेख केला. कॉक्रोज जनता पार्टीचे (सीजेपी) अभिजीत दीपके आणि अन्य कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावर आंदोलन उभे केले होते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न असल्याने या आंदोलनाला विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांचा व्यापक पाठिंबा मिळाला. मात्र, या आंदोलनाशी संबंधित व्यक्तींनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या विरोधात राजकीय आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या जनसमर्थनात घट झाल्याचे निरुपम यांनी सांगितले.

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दरम्यान, संजय राऊत यांच्या राजकीय वक्तव्यांवर टीका करताना निरुपम म्हणाले, सार्वजनिक जीवनात बोलताना प्रत्येकाने विचारपूर्वक आणि तथ्यांच्या आधारावर भूमिका मांडली पाहिजे. निराधार आरोप आणि सनसनाटी वक्तव्यांमुळे संबंधित नेत्याच्या विश्वासार्हतेवर परिणाम होतो.

मराठा तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष नको

महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद करत निरुपम यांनी समाजातील तरुणांचे रोजगार, आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांचे प्रश्न दुर्लक्षित करता येणार नसल्याचे सांगितले. मराठा आरक्षण आंदोलनामागील अस्वस्थता समजून घेऊन त्यावर ठोस तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मराठीचा सन्मान आणि छोट्या व्यावसायिकांचे संरक्षण

मुंबईत मराठी भाषेचा सन्मान राखला जावा आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा, अशी भूमिका निरुपम यांनी मांडली. मोठ्या कंपन्यांच्या वाढत्या प्रभावामुळे छोट्या व्यावसायिकांसमोर आव्हाने निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. पॅकेज्ड दुधाच्या कंपन्यांच्या विस्तारामुळे स्थानिक दूध विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत छोट्या व्यावसायिकांच्या संरक्षणाची गरज त्यांनी अधोरेखित केली.

उद्धव ठाकरेंची बाळासाहेबांच्या विचार धारेपासून फारकत

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा संदर्भ देत निरुपम यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. हिंदुत्व आणि काँग्रेसविरोध ही बाळासाहेबांच्या राजकारणाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. मात्र, मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेमुळे उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि बाळासाहेबांच्या विचारधारेपासून फारकत घेतली, असा आरोप त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून वेगळे होण्याचा घेतलेला निर्णय हा बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेण्याच्या दिशेने उचललेले पाऊल असल्याचेही निरुपम म्हणाले. त्यांच्या या भूमिकेवर संबंधित राजकीय पक्षांची वेगवेगळी मते आहेत.

Nepal Flood News: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती

शिक्षक-पदवीधर निवडणुकांत थेट संपर्क निर्णायक

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांबाबत बोलताना निरुपम यांनी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या, पदवीधरांचे रोजगारविषयक प्रश्न आणि स्थानिक समस्या समजून घेण्यासाठी उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधणे आवश्यक आहे. शिक्षांचा आमदार शिक्षक हवा आणि निवडणुकांमध्ये वैयक्तिक संपर्क, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बांधणी आणि समन्वय यांना विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: संजय निरुपम यांचा सीजेपीवर काय निशाणा?

    Ans: संबंधित व्यक्तींनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या विरोधात राजकीय आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या जनसमर्थनात घट झाल्याचे निरुपम यांनी सांगितले.

  • Que: मराठा समाजाच्या प्रश्नावर निरुपम काय म्हणाले?

    Ans: तरुणांचे रोजगार, आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांचे प्रश्न दुर्लक्षित करता येणार नसल्याचे निरुपम यांनी सांगितले.

Web Title: Shivsena leader sanjay nirupam criticizes to cjp protest gyanesh kumar resign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • neet paper leak
  • pune news
  • Sanjay Nirupam

संबंधित बातम्या

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा
1

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा

Pune Voter List Form 6 Form: मतदार नोंदणी सुलभ; प्रक्रियेला गती, नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी ८३ हजार अर्ज
2

Pune Voter List Form 6 Form: मतदार नोंदणी सुलभ; प्रक्रियेला गती, नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी ८३ हजार अर्ज

Pune MLC Election: पुण्यात पदवीधर, शिक्षक मतदारांचा उत्साह; मतदानासाठी केंद्रांवर गर्दी
3

Pune MLC Election: पुण्यात पदवीधर, शिक्षक मतदारांचा उत्साह; मतदानासाठी केंद्रांवर गर्दी

Manoj Jarange React on Ramdas Kadam: क्लिप कशी व्हायरल झाली हे फडणवीसांना विचारा!; रामदास कदमांवर मनोज जरांगे पाटलांचा पलटवार
4

Manoj Jarange React on Ramdas Kadam: क्लिप कशी व्हायरल झाली हे फडणवीसांना विचारा!; रामदास कदमांवर मनोज जरांगे पाटलांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.