Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Success Story: घरात गळके छत, खाण्यापिण्याची भ्रांत; पण वडिलांच्या एका शब्दाने ‘शिव कुमार’बनला गावातील पहिला डॉक्टर

NEET Success Story Shiv Kumar: मातीच्या घरात राहणाऱ्या आणि गरिबीशी लढा देणाऱ्या बिहारच्या शिव कुमारने नीट (NEET) परीक्षेत मिळवले अद्भूत यश आणि पहिल्या अपयशानंतर डॉक्टर बनण्यापर्यंतचा त्याचा संपूर्ण प्रवास एकदा वाचाच.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 22, 2026 | 01:51 PM
MBBS

MBBS

Follow Us
Follow Us:

NEET Success Story Shiv Kumar: दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या नीट (NEET) परीक्षेत देशभरातील लाखो विद्यार्थी भाग घेतात मात्र, यश काही मोजक्याच उमेदवारांना मिळते. डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणे सोपे आहे, पण ते पूर्ण करणे तितके सोपे नसते. अशा परिस्थितीत तीच लोक ध्येयापर्यंत पोहोचू शकतात, जी कठीण परिस्थितीमध्येही हिंमत हारत नाहीत आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने संघर्ष करत राहतात. असेच एक उदाहरण बिहारचे राहणारे शिव कुमार आहेत, ज्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि असे काही करून दाखवले ज्याचा कोणी विचारही करू शकत नव्हता.

एका छोट्याशा गावात राहणाऱ्या शिव कुमार यांनी डॉक्टर बनण्याचे स्वप्न तर पाहिले, पण पांढऱ्या कोटमध्ये स्वतःला डॉक्टर म्हणून पाहण्याइतके ते पूर्ण करणे सोपे नाही, हे ते विसरले होते. शिव अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. त्यांचे घर मातीचे आणि कच्च्या स्वरूपाचे आहे. त्यांची आई जेव्हा लाकडं गोळा करून आणायची, तेव्हा कुठे त्यांच्या घरातली चूल पेटायची. पावसाळ्यात तर परिस्थिती अशी असायची की घरात ना बसता यायचे ना झोपता; पावसाचे पाणी छतातून टपकायचे आणि वीज नसल्यामुळे विश्रांतीही मिळायची नाही. अशा सर्व संघर्षांत त्यांचे बालपण गेले.

गावापासून २०-२५ किलोमीटर दूर होते रुग्णालय

शिव यांनी आपल्या शालेय शिक्षणाची सुरुवात एका सरकारी शाळेतून केली. त्यांचे वडील गावाबाहेर एका हॉटेलमध्ये आचारी (कूक) म्हणून काम करायचे आणि आई घर सांभाळायची. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती आणि कमवणारे फक्त शिव यांचे वडीलच होते. या सगळ्यात शिव यांना एक गोष्ट नेहमी त्रास द्यायची की, गावात जर कोणी आजारी पडले, तर त्याला उपचारासाठी गावापासून तब्बल २५ किलोमीटर दूर जावे लागायचे.

NEET UG Re-Exam 2026: २१ जूनचा पेपर ठरला प्रचंड कठीण! फिजिक्स आणि केमिस्ट्रीने वाढवला ताण; तज्ज्ञांनी वर्तवला नवा अंदाज

त्यांच्या गावात एकही डॉक्टर नव्हता आणि दूरदूरपर्यंत कोणतेही रुग्णालय नव्हते. अनेकदा तर हॉस्पिटल दूर असल्यामुळे काही लोक अर्ध्या रस्त्यातच आपला जीव गमावायचे, अशा परिस्थितीत शिव कुमार यांनी डॉक्टर बनण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून ते गावातील सर्व लोकांवर उपचार करू शकतील.

पहिल्या प्रयत्नात नीट परीक्षेत चांगली रँक मिळाली नाही

शिव कुमार यांनी सांगितले कि, वर्ष २०२४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा नीट यूजी (NEET UG) परीक्षा दिली. परंतु, ते यशस्वी झाले नाहीत. यामुळे ते खूप निराश झाले आणि त्यांनी पुन्हा नीट परीक्षा न देण्याचे ठरवून बीडीएस (BDS) कडे वळण्याचा विचार केला. मात्र, वडिलांनी समजावल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला. ते दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाले. कित्येक तास अभ्यास करून त्यांना सरकारी कॉलेजही मिळाले. आज ते त्यांच्या गावातून डॉक्टर बनणारे पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत.

NEET UG 2026: ‘टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये मोबाईल!’ नीट परीक्षेत विद्यार्थ्याची अजब शक्कल; पोलिसांनी रंगेहात पकडले

Web Title: Neet success story shiv kumar bihar poor student mbbs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • Doctor
  • MBBS
  • NEET Exam

संबंधित बातम्या

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? परदेशातील ‘या’ ५ प्रमुख देशांमधून MBBS केल्यानंतर भारतात थेट मिळेल प्रॅक्टिस करण्याचा अधिकार!
1

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? परदेशातील ‘या’ ५ प्रमुख देशांमधून MBBS केल्यानंतर भारतात थेट मिळेल प्रॅक्टिस करण्याचा अधिकार!

NEET UG Counselling: नीटच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर! अर्जातील चुका सुधारण्यासाठी ‘रजिस्ट्रेशन रिसेट’चा पर्याय सुरू..
2

NEET UG Counselling: नीटच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर! अर्जातील चुका सुधारण्यासाठी ‘रजिस्ट्रेशन रिसेट’चा पर्याय सुरू..

‘नागरिकांच्या जीवाशी खेळू नका’, डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाचे खडेबोल, संप मागे
3

‘नागरिकांच्या जीवाशी खेळू नका’, डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाचे खडेबोल, संप मागे

NEET UG 2026: नीट परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार? पेपर लीक रोखण्यासाठी केंद्र सरकार काय करणार? जाणून घ्या सविस्तर!
4

NEET UG 2026: नीट परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार? पेपर लीक रोखण्यासाठी केंद्र सरकार काय करणार? जाणून घ्या सविस्तर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.