Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Telegram Ban: नीट परीक्षेसाठी आयटी मंत्रालयाने घेतलेल्या ‘या’ मोठ्या निर्णयावर Telegram Ceo संतापले!

Telegram Ban in India 2026: NEET UG परीक्षेच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे थेट 'टेलिग्राम' (Telegram) चे मालक पावेल ड्यूरोव्ह संतापले आहेत! २१ जूनच्या पुनरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर आयटी मंत्रालयाने टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घातली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 17, 2026 | 09:39 AM
neet

neet

Follow Us
Follow Us:

Pavel Durov on Telegram Ban: २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या नीट-युजी (NEET-UG) पुनरपरीक्षेपूर्वी केंद्र सरकारने टेलिग्राम (Telegram) या मेसेजिंग ॲपवर लावलेली तात्पुरती बंदी आता राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनली आहे. एकीकडे सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (NTA) म्हणणे आहे की, परीक्षेची निष्पक्षता राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना खोट्या अफवांपासून वाचवण्यासाठी हे पाऊल आवश्यक होते. तर दुसरीकडे, टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ (CEO) पावेल ड्यूरोव्ह यांनी या निर्णयावर कडक शब्दांत टीका केली आहे. काही चुकीच्या लोकांमुळे कोट्यवधी सामान्य वापरकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

टेलिग्राम बंदीवर पावेल ड्यूरोव्ह यांचे मोठे वक्तव्य

टेलिग्रामचे संस्थापक पावेल ड्यूरोव्ह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना भारत सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी लिहिले की, “भारताच्या आयटी मंत्रालयाने (IT Ministry) काही लोकांद्वारे परीक्षेचे लीक मेसेज शेअर केल्याच्या आरोपावरून टेलिग्रामवर एका आठवड्यासाठी बंदी घातली आहे. यामुळे भारतातील १५ कोटींहून अधिक सामान्य वापरकर्त्यांवर परिणाम झाला आहे, तर वास्तविक गुन्हेगारांवर याचा काही खास फरक पडणार नाही.” अशा प्रकारच्या कारवाईमुळे समस्या सुटत नाही.

तांत्रिक प्लॅटफॉर्म पूर्णपणे बंद करण्याऐवजी गैरप्रकार करणाऱ्यांवर थेट कारवाई करणे अधिक प्रभावी ठरेल, असे ड्यूरोव्ह यांचे म्हणणे आहे.

सरकारने Telegram वर बंदी का घातली?

केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६९A (Section 69A of IT Act) अंतर्गत टेलिग्रामच्या सेवांवर २२ जून २०२६ पर्यंत तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. ही बंदी नीट-युजी पुनरपरीक्षा आणि त्याच्या लगेचच नंतरचा काळ कव्हर करते. एनटीएच्या मते, गेल्या काही आठवड्यांत टेलिग्रामवर असे अनेक चॅनेल्स सक्रिय होते, जे विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्याचा खोटा दावा करत होते आणि त्याबदल्यात हजारो ते लाखो रुपयांची मागणी केली जात होती. हे पूर्णपणे फसवणुकीचे नेटवर्क होते, जे विद्यार्थी आणि पालकांच्या चिंतेचा गैरफायदा घेत होते.

IIT Bombay मध्ये CSE साठी फक्त ६५ रँकर्सनाच प्रवेश? कॉम्प्युटर सायन्सनंतर ‘या’ ब्रँचची आहे सर्वाधिक क्रेझ!

NTA ची सर्वात मोठी चिंता कोणती होती?

एनटीएने स्पष्ट केले आहे की, टेलिग्रामवरील ही बंदी कोणत्याही नवीन पेपर लीकच्या घटनेमुळे लावलेली नाही. एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितले की, “मुख्य चिंता बनावट मेसेज आणि खोट्या पेपर लीकच्या दाव्यांबद्दल होती, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण आणि संभ्रम निर्माण होत होता.” परीक्षेच्या सुरक्षित प्रणालीबाहेर कोणतीही खरी प्रश्नपत्रिका उपलब्ध नसते आणि पेपर विकण्याचा प्रत्येक दावा हा फसवणूक आहे, असे सांगत एनटीएमध्ये सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी कोणती कारवाई झाली होती?

एनटीएच्या मते, टेलिग्रामवर बंदी घालणे हा शेवटचा पर्याय होता. याआधी गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ‘भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने’ (I4C) बिहार, गुजरात आणि राजस्थान पोलिसांच्या मदतीने अनेक संशयास्पद चॅनेल्स, ग्रुप्स आणि बॉट्स हटवले होते. यामध्ये ‘पेपर लीक नीट’, ‘री-नीट २०२६’, “प्रायव्हेट माफिया” आणि “REE NEET MAFIAA” अशा नावांच्या चॅनेल्सवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, तरीही खोटे मेसेज पूर्णपणे न थांबल्यामुळे प्लॅटफॉर्म पातळीवरच बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा लागला.

International Business Visa: परदेशात व्यापार सुरू करायचाय? मग तुमच्या गरजेनुसार ‘योग्य’ व्हिसा कसा निवडायचा? पहा एका क्लिकवर..

Web Title: Neet ug re exam 2026 telegram ban india nta updates marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • app
  • NEET Exam
  • Telegram

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.