Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG Re-Exam: नागपूरच्या विद्यार्थ्यांला केंद्र मिळालं थेट युएईमध्ये! एनटीएच्या या भोंगळ कारभारावर विद्यार्थ्यांचा संताप!

NEET UG Re-Exam 2026: NEET UG फेरपरीक्षेपूर्वी NTA चा मोठा गोंधळ समोर आला आहे. नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट अबूधाबीचे परीक्षा केंद्र मिळाले असून, पासपोर्ट नसताना तो परीक्षा कशी देणार? वाचा सविस्तर

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 20, 2026 | 12:59 PM
NEET

NEET

Follow Us
Follow Us:

NEET UG Re-Exam 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सी(NTA) कडून आयोजित केल्या जाणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी सरकार पूर्णपणे पाठिंबा देत आहे. तरी एनटीएकडून काही ना काही घटना घडत आहेत. त्यामुळे आता एनटीएच्या प्रणालीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आताचे ताजे प्रकरण महाराष्ट्रातील नागपूरचा रहिवासी असलेल्या ‘अब्दुल्लाह’ नावाच्या विद्यर्थ्यांशी संबंधित आहे, २१ जून रोजी होणाऱ्या NEET UG फेरपरीक्षेसाठी त्याला संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) अबूधाबी येथील परीक्षा केंद्र नेमून देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत भारतात राहून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला थेट परदेशात केंद्र मिळाल्यामुळे एजन्सीच्या कारभारावर आणि केंद्र वाटप प्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नीटच्या विद्यार्थ्याने नागपूर-वर्धा येथे मागितले होते एक्झाम सेंटर

एनटीएच्या या मोठ्या निष्काळजीपणामुळे अब्धुलाह नावाच्या विद्यार्थ्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. या विद्यार्थ्यांने नीट परीक्षा केंद्रासाठी आपल्या पसंतीक्रमात नागपूर आणि वर्धा या शहरांचा समावेश केला होता. परंतु, त्याला युएई अबूधाबी येथे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.

NEET UG Re-Exam: NTA चा मोठा निर्णय! नीट परीक्षा केंद्रांत बायोमेट्रिक पडताळणीशिवाय मिळणार नाही प्रवेश?

नीट यूजी फेरपरीक्षा होण्यासाठी आता अवघा एक दिवस उरला असून एनटीएकडून ही सर्वात मोठी चूक झाली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्याकडे पासपोर्ट नसून त्याला परदेशात जाऊन परीक्षा देणे शक्य नसल्याचे विद्यार्थ्यांने सांगितले. तसेच त्याने आपली तक्रार एनटीएच्या हेल्पलाइनवर नोंदवली आहे.

अधिकारी काय म्हणाले?

यावर एनटीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही एक तांत्रिक चूक असल्याने शनिवारी सकाळपर्यंत ही चूक सुधारली जाईल आणि संबंधित विद्यर्थ्यांला नवीन प्रवेशपत्र जारी केली जाईल.

IIT Bombay मध्ये नवा ट्रेंड! विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर सायन्स सोडून ‘या’ शाखेला का दिली पसंती? पहा एका क्लिकवर..

परंतु, जोपर्यंत NTA कडून कोणतेही अधिकृत माहिती किंवा सुधारित प्रवेशपत्र जारी केले जात नाही. तोपर्यंत विद्यार्थी आणि त्याचे कुटुंब प्रचंड चिंतेत असतील. आता एजन्सी या समस्येचे निवारण किती लवकर करते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

NTA चा हेल्पलाइन नंबर काय आहे?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) दिलेल्या नीट फेरपरीक्षेच्या प्रवेशपत्रामध्ये परीक्षा केंद्र वाटपाबाबत किंवा इतर कोणतीही त्रुटी असल्यास उमेदवार एनटीएच्या अधिकृत हेल्पलाईन क्रमांक 011-40759000 किंवा 011-69227700 यावर संपर्क साधू शकतात.

Web Title: Neet ug re exam nagpur student allotted abu dhabi centre nta glitch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • medical student
  • NEET
  • UAE

संबंधित बातम्या

Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…
1

Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.