फोटो सौजन्य- सोशल मीडिया
IIT Bombay Civil Engineering Cutoff Rank 2026: जेव्हा भारतातील आयआयटीचा उल्लेख निघतो, तेव्हा विद्यार्थ्यांच्या पसंतीक्रमामध्ये ‘आयआयटी बॉम्बे’ (IIT Bombay)चे नाव पहिल्या क्रमांकांवर येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठा रस दाखवला आहे. परंतु, यंदा या आयआयटी प्रवेशामध्ये विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीच्या क्षेत्राचा कल बदललेला पहायला मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांनी एआय एमएल (AI-ML) आणि कॉम्प्युटर सायन्सऐवजी दुसऱ्याच क्षेत्राला म्हणजेच सिव्हिल इंजिनीअरिंगला पसंती दिल्याचे दिसून आले.
जोसा कौन्सिलिंग २०२६ च्या पहिल्या फेरीच्या ओपनिंग आणि क्लोजिंग रँकवरून हा खुलासा करण्यात आला असून विद्यार्थ्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये जास्त रस का दाखवला. चला जाणून घेऊया…
जोसा कौन्सिलिंग २०२६ च्या पहिल्या फेरीच्या डेटावर नजर टाकल्यास आयआयटी बॉम्बेमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा सिव्हिल इंजिनीअरिंग कोर्सकडे वाढताना दिसत आहे. या ट्रेडला गेल्या वर्षी सिव्हिल इंजिनीअरिंगची ओपनिंग रँक एकूण २६६६ होती तर ती आता ऑल इंडिया रँक (AIR) ३८५ वर आली आहे. यावरून स्पष्ट होते की, विद्यार्थ्यांची पहिली पसंती आता सिव्हिल इंजिनीअरिंग ठरत आहे. यावरून कॉम्प्युटर सायन्स शाखेप्रमाणेच सिव्हिल इंजिनीअरिंगमध्येही विद्यार्थ्यांचा रस दिसून आल्याचे स्पष्ट होते.
UPSC मध्ये EWS आरक्षणाचा गैरवापर? नेमकं काय सांगतो UPSC 2025 चा रिपोर्ट? वाचा एका क्लिकवर..
आयआयटी बॉम्बेमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पायाभूत सुविधा प्रकल्प आणि स्मार्ट सिटी योजनांसह विविध बांधकाम क्षेत्रांच्या गरजा लक्षात घेऊन शिकवला जातो.
या बदलामागील मुख्य कारण म्हणजे ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज’ (QS World University Rankings)च्या यादीत आयआयटी बॉम्बेचा सिव्हिल इंजिनीअरिंग प्रोग्राम भारतात पहिल्या स्थानावर राहिला आहे. ज्यामुळे या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचे आकर्षण वाढले आहे.
तज्ञांच्या मते, इन्फ्रास्टक्चर, शहरी विकास, स्मार्ट सिटी प्रकल्प आणि सरकारी गुंतवणुकीतील वाढ यामुळे सिव्हिल इंजिनीअरिंगच्या क्षेत्रात करिअरच्या संधी निर्माण होत आहेत. याच कारणामुळे विद्यार्थी केवळ एआय आणि कॉम्प्युटर सायन्स यावर अवलंबून न राहता पारंपारिक इंजिनीअरिंग शाखांकडेही पुन्हा वळू लागले आहेत.






