Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…

शारजाहमध्ये नोकरी करणाऱ्या कर्नाटकातील भारतीयाचा अचानक संपर्क तुटला आणि कुटुंबीयांनी शोध सुरू केला. काही दिवसांनी ओमानच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एका कारमध्ये त्यांचा मृतदेह नऊ तुकड्यांत सापडला; मात्र त्यानंतर आणखी एक गूढ उभे राहिले—पत्नी आणि मुलगा कुठे आहेत?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 23, 2026 | 10:20 AM
Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्...

Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्...

Follow Us
Follow Us:
  • भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे
  • ओमान मार्गावरील कारमध्ये आढळला मृतदेह
  • पत्नी व मुलाचा ठावठिकाणा अद्याप अस्पष्ट
 

पुणे : चांगल्या आयुष्याच्या आणि भविष्यातील शोधात यूएईतील शारजाह येथे गेलेल्या कर्नाटकातील एल्विन प्रकाश कुंदर यांची जुलैमध्ये निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाचे नऊ तुकडे करून ते दोन बॅगमध्ये ठेवण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. ओमानच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एका कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. दरम्यान, प्रकाश यांची पत्नी टीना आणि त्यांचा दहावीत शिकणारा मुलगा कुठे आहेत, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. हत्येचे कारण आणि संशयितांची ओळखही अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. एल्विन प्रकाश कुंदर हे कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंडापूर येथील रहिवासी होते. ते गेल्या सुमारे १४ वर्षांपासून शारजाह विमानतळावर काम करत होते. ते पत्नी टीना आणि मुलासोबत शारजाहमध्ये राहत होते. टीना या शाळेत शिक्षिका असून त्यांचा मुलगा दहावीत शिकत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रकाश भारतात आले होते. त्यानंतर ते पुन्हा शारजाहला गेले होते.

विचित्र संदेशामुळे संशय

प्रकाश यांचे भाऊ अनिल प्रशांत कुंदर यांनी सांगितले की, २० जुलैच्या सुमारास त्यांनी प्रकाश यांना फोन केला. मात्र, प्रकाश यांनी फोन न उचलता संदेशाद्वारे आपण ठीक असल्याचे कळवले. हा प्रकार कुटुंबीयांना संशयास्पद वाटला. कारण प्रकाश नेहमी व्हॉइस मेसेजद्वारे संवाद साधत होते. त्यानंतर पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अनिल यांनी शारजाहमध्ये असलेल्या प्रकाश यांच्या वर्गमित्र मनोहर यांच्याशी संपर्क साधून प्रकाश यांची माहिती घेण्यास सांगितले. मनोहर प्रकाश राहत असलेल्या कंपनीच्या निवासस्थानी गेले. तेथे वॉचमनने प्रकाश भारतात गेल्याचे सांगितल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. कंपनीच्या एचआर विभागाकडूनही सुरुवातीला प्रकाश भारतात गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, अनिल यांनी प्रकाश भारतात परतले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर कंपनीने पासपोर्टची माहिती तपासली असता प्रकाश अजूनही शारजाहमध्ये असल्याचे समोर आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली.

कारमध्ये सापडला मृतदेह

शोध सुरू असताना ओमानच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उभ्या असलेल्या कारमध्ये प्रकाश यांचा मृतदेह आढळल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मृतदेहाचे नऊ तुकडे करून दोन बॅगमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर मृतदेहाची ओळख प्रकाश कुंदर म्हणून करण्यात आली. हत्येचा नेमका उद्देश काय होता, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शारजाह प्रशासनाकडून संशयितांची ओळख किंवा हत्येमागील कारण जाहीर करण्यात आलेले नसल्याचे वृत्त आहे.

पत्नी-बेटा कुठे?

प्रकाश यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी टीना आणि मुलाचा ठावठिकाणा स्पष्ट झालेला नाही. काही वृत्तांमध्ये दोघे शारजाहमधून भारतात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसेच टीना यांचा हत्येत सहभाग असल्याचा कोणताही ठोस पुरावा किंवा अधिकृत निष्कर्ष सध्या उपलब्ध नाही. कुटुंबीयांनीही प्रकाश आणि टीना यांच्यात कोणत्याही वादाची माहिती नसल्याचे सांगितले आहे.

कुटुंबीयांकडून मदतीची मागणी

प्रकाश यांचे भाऊ अनिल यांनी उडुपीच्या पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणात मदत करण्याची मागणी केली आहे. यूएईतील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रकाश यांचा मृतदेह भारतात आणण्याची कुटुंबीयांना प्रतीक्षा आहे. तसेच हत्या नेमकी कशी झाली, मृतदेह कोणत्या परिस्थितीत आढळला आणि प्रकाश यांच्या पत्नी व मुलाचा ठावठिकाणा काय आहे, याबाबत अधिक माहिती देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

Web Title: Sharjah indian man alwin prakash kunder mursharjah indian man alwin prakash kunder murder body nine piecesder body nine pieces

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Crime . Crime News
  • UAE

संबंधित बातम्या

Crime News: गणपती दर्शनाला मित्र-मैत्रिणींसोबत गेल्याच्या संशयातून पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला
1

Crime News: गणपती दर्शनाला मित्र-मैत्रिणींसोबत गेल्याच्या संशयातून पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला

दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत
2

दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली
3

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली

Thane Crime: ठाण्यात नात्याला काळिमा; धमकीमुळे तरुणी गप्प, पाच-सहा महिने भावांकडून वारंवार अत्याचार अन्…
4

Thane Crime: ठाण्यात नात्याला काळिमा; धमकीमुळे तरुणी गप्प, पाच-सहा महिने भावांकडून वारंवार अत्याचार अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.