Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG Re-Exam: नीट परीक्षेसाठी भारतात Telegram बॅन; पण बंदीनंतरही ॲप कसं चालतंय? सायबर तज्ज्ञाचा खळबळजनक दावा

NEET UG Re-Exam 2026: नीट-युजी (NEET-UG) पुनरपरीक्षेच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने घेतलेल्या 'टेलिग्राम बंदी'च्या निर्णयावर आता सायबर तज्ज्ञांनीच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 17, 2026 | 12:25 PM
neet

neet

Follow Us
Follow Us:

NEET UG Re-Exam: २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या नीट-युजी (NEET-UG) पुनरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) सुरक्षेचा उपाय म्हणून टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घातली आहे. १६ जून रोजी करण्यात आलेल्या या घोषणेनुसार २२ जून २०२६ पर्यंत ही बंदी लागू राहील. मात्र, पेपर लीक रोखण्यासाठी उचललेले हे पाऊल किती प्रभावी ठरेल, याबाबत आताच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

सीबीएसईच्या (CBSE) तांत्रिक त्रुटी समोर आणणारे १९ वर्षीय सायबर सुरक्षा संशोधक निसर्ग अधिकारी यांनी दावा केला आहे की, बंदी घातल्यानंतरही ते भारतात टेलिग्राम वापरू शकत आहेत. त्यामुळे अशा प्रकारची बंदी हा पेपर लीकवर कायमस्वरूपी तोडगा असू शकतो का, असा सवाल त्यांनी केला आहे.

> can’t stop paper leaks
> ends up blocking telegram
blocking telegram totally isn’t even possible, telegram is designed in such a way which easily allows people to use proxies and other methods of circumvention. https://t.co/kv0VliWGrC — nisarga (@ni5arga) June 16, 2026

“पेपर लीक रोखता आला नाही अन्…” – निसर्ग अधिकारी यांची टीका

निसर्ग अधिकारी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वर अधिकृत पोस्ट करत एनटीएला टॅग केले आहे. त्यांनी लिहिले की, “पेपर लीक रोखता आला नाही आणि शेवटी टेलिग्राम ब्लॉक करून टाकले.” यासोबतच त्यांनी तांत्रिक बाबींवर बोट ठेवत म्हटले की, टेलिग्रामला पूर्णपणे ब्लॉक करणे शक्यच नाही. या ॲपची रचनाच अशी करण्यात आली आहे की, लोक प्रॉक्सी (Proxy) आणि इतर पर्यायी माध्यमांचा वापर करून ते सहज चालवू शकतात.

गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणाची सुवर्णसंधी; Lloyds Metals कडून कर्टिन विद्यापीठासाठी अर्ज सुरू!

पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो सावधान! एनटीएने उघड केला ‘हा’ मोठा स्कॅम

टेलिग्रामवर बंदी घातल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ‘X’ वर पोस्ट करून सर्व नीट उमेदवार आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाचा इशारा (Alert) जारी केला आहे. एनटीएच्या मते, टेलिग्रामवर स्कॅमर्सद्वारे दोन मोठे रॅकेट चालवले जात होते.
१. पैसे मागणे: काही चॅनेल्स कथित पेपर देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून १४,००० ते २५,००० रुपये, तर काही चॅनेल्स थेट १० लाख रुपयांपर्यंतची मागणी करत होते.
२. एडिट फीचरचा गैरवापर: दुसऱ्या रॅकेटमध्ये परीक्षेपूर्वीच्या चॅट्स आणि बनावट पुराव्यांचे व्हिडिओ दाखवले जात होते, ज्यामध्ये ‘मैसेज एडिट’चा पर्याय वापरून लोकांना फसवले जात होते.

दिल्ली हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! खाजगी शाळांतील महिला शिक्षिकांनाही मिळणार आता Child Care Leave!

टेलिग्राम बंदी हा पेपर लीकवर खरंच उपाय आहे का?

तज्ज्ञांच्या मते, टेलिग्राम किंवा इतर कोणत्याही मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तात्पुरती बंदी घातल्याने अफवा, बनावट प्रश्नपत्रिका आणि संघटित फसवणुकीच्या नेटवर्कला काही काळासाठी नक्कीच आळा घालता येऊ शकतो. परंतु, हा या समस्येचा मूळ उपाय नाही.

Web Title: Neet ug re exam telegram ban cyber expert nisarg adhikari nta scam alert marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • NEET Exam
  • Telegram

संबंधित बातम्या

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
1

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!
2

NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.