फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Lloyds Metals Global Education Program : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) यांनी त्यांच्या ग्लोबल एज्युकेशन प्रोग्रामच्या चौथ्या बॅचसाठी अर्ज मागवले आहेत. या उपक्रमाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणारा हा कार्यक्रम श्री. बी. प्रभाकरन यांच्या गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठीच्या विविध उपक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमामुळे या भागातील २४ विद्यार्थी आधीच ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहेत.
ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा उपक्रम आता गडचिरोलीतील तरुणांसाठी मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअर घडविण्याचा मार्ग ठरत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांनी बारावी (PCM/PCMB) किंवा विज्ञान शाखेतील पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवले आहेत, त्यांच्यासाठी १३ जून ते २० जून या कालावधीत अर्ज प्रक्रिया खुली आहे.
याबाबत बोलताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन म्हणाले की, “देशातील काही अत्यंत हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थी अशा भागांतून येतात, जिथे संधींची कमतरता असते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही गडचिरोलीतील पात्र विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि आत्मविश्वास मिळावा यासाठी प्रयत्नशील आहोत. या जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत असून स्वतःसाठी नवीन संधी निर्माण करत आहेत, हे पाहून आनंद वाटतो.”
गडचिरोलीतील अनेक विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न आर्थिक अडचणींमुळे अपूर्ण राहते. ग्लोबल एज्युकेशन प्रोग्रामच्या माध्यमातून श्री. बी. प्रभाकरन हे हे अंतर कमी करण्याचे काम करत आहेत. या उपक्रमामुळे पात्र विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे. चौथ्या बॅचसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याने हा कार्यक्रम अधिकाधिक तरुणांना शिक्षण, प्रगती आणि उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी देत आहे.
Telegram Ban: नीट परीक्षेसाठी आयटी मंत्रालयाने घेतलेल्या ‘या’ मोठ्या निर्णयावर Telegram Ceo संतापले!






