
exam
NTA Exam Calendar 2026-27: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने डिसेंबर २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत होणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रवेश आणि पात्रता परीक्षांचे अधिकृत एग्झाम कॅलेंडर (Exam Calendar) जाहीर केले आहे. यामध्ये UGC NET, CSIR UGC NET, JEE Main, CMAT आणि CUET PG यांसारख्या प्रमुख परीक्षांच्या संभाव्य तारखांचा समावेश आहे.
कॅलेंडर जाहीर झाल्यामुळे या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे आणि नियोजनाचे टप्पे ठरवणे सोपे होणार आहे. मात्र, या सर्व तारखा संभाव्य असून गरजेनुसार त्यात बदल केला जाऊ शकतो, असेही एनटीएने स्पष्ट केले आहे.
UGC NET (डिसेंबर २०२६): १४ ते १९ डिसेंबर २०२६ (२० आणि २१ डिसेंबर या तारखा बफर डेट्स म्हणून राखीव).
Joint CSIR UGC NET: २० आणि २१ डिसेंबर २०२६.
JEE Main 2027 (Session 1): २२, २३, २४ आणि २८, २९, ३० जानेवारी २०२७ (३१ जानेवारी ही बफर डेट असेल).
Army Cadets College Exam: ४ जानेवारी २०२७.
CMAT 2027: ७ फेब्रुवारी २०२७.
NITTT (Part 1): २६ आणि २७ फेब्रुवारी २०२७.
CUET PG 2027: मार्च २०२७ मध्ये सलग १७ दिवसांच्या कालावधीत परीक्षा पार पडेल.
NITTT (Part 2): ५ आणि ७ मार्च २०२७.
एनटीएच्या या नवीन कॅलेंडरमध्ये वरील प्रमुख परीक्षांव्यतिरिक्त आर्मी कॅडेट्स कॉलेज, निफ्ट (NIFT) एन्ट्रन्स एक्झाम, सैनिक शाळा प्रवेश परीक्षा यांसारख्या इतर विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचाही समावेश करण्यात आला आहे.
एनटीएने स्पष्ट केले आहे की, हे केवळ परीक्षेच्या कालावधीचे नियोजन करणारे कॅलेंडर आहे. याला अधिकृत नोटिफिकेशन मानू नये. प्रत्येक परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख, परीक्षा केंद्रे, ॲडमिट कार्ड, आन्सर की आणि निकालाबाबतची सविस्तर माहिती देणारे ‘इन्फॉर्मेशन बुलेटिन’ स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाईल.