Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

NTA Recruitment 2026: NTA ने यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात AI द्वारे केलेल्या भाषांतराची अचूकता तपासण्यासाठी विशेष भाषांतर समीक्षकांची मागणी केली आहे. तरी इच्छुक उमेदवार आणि पात्र उमेदवार एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 17, 2026 | 04:10 PM
ai

ai

Follow Us
Follow Us:

NTA Recruitment 2026: जर तुम्ही शिक्षक, संशोधक किंवा शिक्षणतज्ज्ञ असाल आणि देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षांच्या प्रक्रियेशी जोडले जाऊ इच्छित असाल, तर तुमच्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये (NTA) काम करण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. एनटीए देशात आणि परदेशात NEET UG आणि JEE Main सारख्या मोठ्या प्रवेश परीक्षांचे आयोजन करते. या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी आता देशभरातील गुणवंत शिक्षणतज्ज्ञ आणि तज्ज्ञांना आमंत्रित केले जात आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यासाठी ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (EOI) जारी केले आहे. याद्वारे पात्र आणि अनुभवी व्यक्ती एनटीएशी जोडून देशाच्या मूल्यमापन पद्धतीचा भाग बनू शकतात. यामुळे तुमच्या शैक्षणिक अनुभवाला एक नवीन आयाम मिळेल. गेल्या काही काळापासून एनटीएची परीक्षा पद्धती, पेपर लीक आणि इतर गोंधळामुळे वादात सापडली होती. आता या प्रक्रियेमुळे देशातील सर्वात मोठ्या परीक्षांची पारदर्शकता आणि गुणवत्ता मजबूत करण्यात तुमचेही महत्त्वाचे योगदान असू शकते.

विषयांच्या तज्ज्ञांपासून भाषांतर समीक्षक बनण्याची संधी

परीक्षा पद्धती अधिक अचूक, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवणे हा या नव्या पावलाचा मुख्य उद्देश आहे. या वेळी केवळ विषय तज्ज्ञांची भरती केली जात नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात AI द्वारे केलेल्या भाषांतराची अचूकता तपासण्यासाठी विशेष भाषांतर समीक्षकांची देखील मागणी करण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवार आणि पात्र उमेदवार ९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

विषय तज्ज्ञांची मुख्य भूमिका काय असेल?

एनटीएच्या या विशेष पॅनेलमध्ये समाविष्ट होणाऱ्या विषय तज्ज्ञांचे काम केवळ प्रश्न तयार करणे एवढेच नसून, ती एक मोठी जबाबदारी आहे:

  • दिलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारे उच्च दर्जाच्या प्रश्नपत्रिका तयार करणे.
  • प्रश्नपत्रिकेचे पुनरावलोकन करणे आणि प्रश्नांची काठिण्य पातळी तपासणे.
  • परीक्षेचा ब्लूप्रिंट पूर्णपणे योग्य आहे याची खात्री करणे.
  • निष्पक्ष आणि पारदर्शक मॉडरेशन प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणे.
NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!

१३ भाषांसाठी भाषांतर समीक्षकांची गरज का आहे?

एनटीए देशभरातील विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा आयोजित करते. अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI द्वारे केलेल्या भाषांतराची अचूकता तपासण्यासाठी भाषांतर समीक्षकांची नियुक्ती केली जात आहे.

हे समीक्षक हे सुनिश्चित करतील की परीक्षेतील प्रश्न सर्व भारतीय भाषांमध्ये पूर्ण स्पष्टतेसह आणि एकसमानतेने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील. यामुळे कोणत्याही भाषेतील विद्यार्थ्याला प्रश्न समजून घेण्यात कोणताही भ्रम किंवा अडचण निर्माण होणार नाही.

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!

Web Title: Nta recruitment 2026 subject expert translation reviewer apply online marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • ai
  • education
  • JEE exam
  • NEET Exam
  • Translate

संबंधित बातम्या

QUAD : भारतासह चार देशांची मोठी रणनीती! AI, महत्त्वपूर्ण खनिजे आणि समुद्री सुरक्षेसाठी करणार सहकार्य
1

QUAD : भारतासह चार देशांची मोठी रणनीती! AI, महत्त्वपूर्ण खनिजे आणि समुद्री सुरक्षेसाठी करणार सहकार्य

Hingoli Bharti 2026: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी! हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांसाठी मुलाखतीद्वारे थेट निवड
2

Hingoli Bharti 2026: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी! हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांसाठी मुलाखतीद्वारे थेट निवड

MBBS Controversy: परदेशातून MBBS करण्याचे स्वप्न पाहताय? NMC च्या परस्परविरोधी उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!
3

MBBS Controversy: परदेशातून MBBS करण्याचे स्वप्न पाहताय? NMC च्या परस्परविरोधी उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!

CA Foundation Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CA फाउंडेशनचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर; असा तपासा स्कोअरकार्ड
4

CA Foundation Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CA फाउंडेशनचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर; असा तपासा स्कोअरकार्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.