
internship
NeGD Technical Internship Program २०२६: तुम्ही इंजिनिअरिंगचे (अभियांत्रिकी) शिक्षण घेत असाल किंवा पूर्ण झाले असेल तमच्यासाठी भारत सरकारकडून एक सुवर्णसंधी दिली जात आहे, ज्याअंतर्गत तुम्ही प्रत्यक्ष काम शिकू शकता.ज्याचे तुम्हाला दरमहा स्टायपेंड (मानधन) देखील मिळणार आहे.
डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स डिव्हिजन (NeGD) द्वारे ‘टेक्निकल इंटर्नशिप कार्यक्रम २०२६’ साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. जे उमेदवार इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर (Graduate) आहेत किंवा ज्यांचे पोस्ट ग्रॅज्युएशन (Post Graduation) पूर्ण झाले आहे, त्यांना या खास इंटर्नशिप प्रोग्राममध्ये सहभागी होता येणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार १५ जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ५० जागा भरल्या जाणार आहेत.
हा टेक्निकल इंटर्नशिप प्रोग्राम एकूण ६ महिन्यांसाठी असून हा कार्यक्रम ‘समर इंटर्नशिप’ (Summer Internship) म्हणून डिझाइन करण्यात आला आहे. यादरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २०,००० रुपये स्टायपेंड दिला जाईल. तसेच वरिष्ठ प्रोफेशनल्ससोबत प्रत्यक्ष (Live) प्रोजेक्ट्सवर काम करण्याची आणि तांत्रिक क्षेत्रातील बारकावे शिकण्याची संधी उमेदवारांना मिळेल.
सॉफ्टवेअर टेस्टिंग / क्यूए / सिक्युरिटी टेस्टिंग / ॲनालिस्ट: ११ पदे
डेटाबेस प्रोग्रामर: ६ पदे
बिझनेस ॲनालिस्ट: ६ पदे
जावा / पीएचपी / पायथन / नोड.जेएस / .नेट डेव्हलपर: ६ पदे
यूआय/यूएक्स डिझायनर / फ्रंटएंड डेव्हलपर: ६ पदे
डेटा इंजिनिअरिंग / ॲनालिटिक्स: ५ पदे
एआय / एमएल / आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स): ५ पदे
डेव्हऑप्स / ऑटोमेशन / इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग: ५ पदे
१. सर्वात आधी अधिकृत वेबसाईट dicmedia.digitalindiacorporation.in वर जावे.
२. येथे ‘Internship Section’ ओपन करा आणि त्यानंतर ‘Opening Details’ या पर्यायावर क्लिक करावे.
३. यानंतर ‘Technical Internship (Summer Programme 2026)’ या लिंकवर क्लिक करावा.
४. आता ‘Apply’ लिंकवर क्लिक करून अर्ज (Application Form) भरावा.
५. सर्व विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरा आणि संबंधित कागदपत्रे सबमिट करावे.
६. कागदपत्रे अपलोड करताना तुमचा अपडेटेड सीव्ही (CV) आणि कॉलेजने दिलेले एनओसी (NOC – नाहरकत प्रमाणपत्र) देखील अपलोड करावे.
७. यानंतर तुमच्या आवडीचे इंटर्नशिप प्रोफाईल निवडून फॉर्म ‘Submit’ करावे.
८. शेवटी, कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट आऊट काढून ठेवावे.