फोेटो सौजन्य- सोशल मीडिया
Vaibhav Suryavanshi IPL: भारतात पहिल्यांदाच क्रिकेटर वैभव सुर्यवंशीवर ‘मल्टीडिसीप्लिनरी स्टडी’ केला जाणार आहे. ज्यामध्ये वैभवचे प्रदर्शन आणि त्याच्या यशाचे विभिन्न पैलू यांवर अधिक लक्ष दिले जाईल. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, (IIM) इंदूर या शैक्षणिक संस्थेचा 15 वर्षीय वैभव सुर्यवंशी हा अभ्यासाचा मुख्य केंद्र असणार आहे. राजस्थान रॉयल्सचा युवा ओपनरने क्रिकेट विश्वात ज्या प्रक्रारे आपली ओळख निर्माण केली आहे, त्या सर्व घटकांना समजण्याचा प्रयत्न या केस स्टटीद्वारे केला जाणार आहे. त्यामुळे या अभ्यासाला देशातली पहिली ‘मल्टीडिसीप्लिनरी स्टडी’ मानले जात आहे. क्रिडा विज्ञान, व्यवस्थापन आणि मानसशास्त्र या क्षेत्रातले तज्ञ वैभवच्या यशामागची कारणीमीमांसा करणार आहेत.
राजस्थान रॉयल्सच्या युवा ओपनर वैभव सुर्यवंशीने यंदाच्या सिझनमध्ये 72 सिक्स मारून क्रिस गेलचा 14 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड तोडला आहे. त्याच्या या विशेष कामगिरीमुळे क्रिकेट जगतातील चाहत्याचे त्याने विशेष ध्यान आकर्षित केले आहे. त्याच्या याच यशाच्या प्रारुपाला समजण्यासाठी IIM इंदूरकडून एक विस्तृत अभ्यास केला जात आहे.
CBSE Administrative Change: सीबीएसईमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल; अध्यक्ष आणि सचिवांची तडकाफडकी बदली!
त्याचा सक्सेस फॉर्मुला डिकोड करण्यासह त्याच्या सामाजिक, मानसिक, कौटुंबिक आणि संस्थात्मक पैलूंचे सखोल विश्लेषण केले जाणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष हिमांशु रॉयने एका व्हिडिओद्वारे या अभ्यासाची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, वैभवचे यश हे दर्शवते की, योग्य मार्गदर्शन, समर्पण आणि संधी मिळाल्यास कमी वयातही असाधारण कामगिरी दिसू शकते. तसेच त्यांनी सांगितले की, या अभ्यासादरम्यान वैभवच्या यशासंबंधी सर्व पैलूंवर लक्ष दिले जाईल, जितके सध्या त्याच्या कामगिरीवर लक्ष दिले जात आहे.
त्यानी पुढे सांगितले की, अनेकवेळा अतिअपेक्षा आणि दबावामुळे हुशार मुले मानसिकदृष्ट्या थकतात. तसेच ते लवकर बर्नआउटचे शिकार होतात. ज्यामुळे ते त्यांची पूर्ण क्षमता दाखवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कौशल्यासह त्याचे मानसिक आरोग्य, भावनिक संतुलन आणि परिपूर्ण विकासावर लक्ष देणे आवश्यक आहे.






