Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता एकही पेपर लीक होणार नाही? NTA ची संपूर्ण रचना बदलली; जाणून घ्या NTA चा मास्टरप्लॅन!

NTA Big Changes Supreme Court: पेपर लिकचे गंभीर आरोप आणि नीट यूजी परीक्षेवरून झालेल्या वादानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) परीक्षा प्रणाली, सुरक्षा व्यवस्था आणि कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 24, 2026 | 10:48 AM
nta

nta

Follow Us
Follow Us:

NTA Big Changes Supreme Court : पेपर लिकचे गंभीर आरोप आणि नीट यूजी परीक्षेवरून झालेल्या वादानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) परीक्षा प्रणाली, सुरक्षा व्यवस्था आणि कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर, आता एनटीएने आपल्या प्रशासकीय रचनेपासून ते कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, परीक्षांचे संचालन आणि सुरक्षा व्यवस्थेपर्यंत अनेक आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या ताज्या प्रतिज्ञापत्रात एनटीएने या सुधारणांच्या सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली आहे.

या बदलांचा एक भाग म्हणून एनटीए ‘एग्झाम स्पेसिफिक युनिट्स’ऐवजी ‘फंक्शनल व्हर्टिकल स्ट्रक्चर’कडे वाटचाल करत आहे. याशिवाय, दिल्लीतील मिंटो रोड येथील नवीन सरकारी इमारतीमध्ये गुप्त कामकाजाची जागा हलवण्यात आली असून, ३९ सीआयएसएफ (CISF) जवानांवर सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर एआय (AI) आधारित देखरेखीसह अनेक तांत्रिक उपायांचा अवलंब केला जात आहे. प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी एक्स-रे बॅगेज स्क्रिनिंग आणि डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर्सद्वारे कसून तपासणी केली जाईल.

प्रशासकीय रचना अन् अधिकारी पदांमध्ये मोठे बदल

एनटीएमध्ये आधी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या परीक्षांच्या हिशोबाने वेगवेगळ्या युनिट्समध्ये विभागले जात होते. आता ही व्यवस्था बदलून काम आणि कौशल्याच्या आधारे ‘फंक्शनल व्हर्टिकल’ तयार केले जात आहेत.

एनटीएच्या वरिष्ठ नेतृत्वातही मोठे बदल केले जात आहेत. डायरेक्टर जनरल या पदाचा दर्जा जॉइंट सेक्रेटरी स्तरावरून वाढवून ॲडिशिनल सेक्रेटरी स्तरापर्यंत करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. याशिवाय जॉइंट सेक्रेटरी स्तराची ५ नवीन पदे निर्माण करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.

Devendra Fadnavis on MPSC : एमपीएससीत होणार विक्रमी महाभरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!

मे २०२६ मध्ये सेंट्रल स्टाफिंग स्कीमअंतर्गत दोन जॉइंट डायरेक्टर एनटीएमध्ये तैनात करण्यात आले होते. ऑगस्टमध्ये आणखी १४ अधिकारी एजन्सीत सामील झाले. यात आयएएस (IAS), आयपीएस (IPS), आयआरएस (IRS) आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस (ISS) यांसारख्या विविध नागरी सेवांमधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

तज्ज्ञांची भरती: सुरक्षा, एचआर (HR), असेसमेंट आर अँड डी, टेस्ट सेंटर, कॅन्डिडेट एक्सपिरियन्स, माहिती सुरक्षा आणि व्हिजिलन्स यांसारख्या क्षेत्रांतील तज्ज्ञांची भरती केली जात आहे.

Sports Quota: क्रीडापटूंसाठी खूशखबर! CRPF मध्ये ५२१ जागांवर भरती; कोणतीही लेखी परीक्षा नाही

प्रश्नपत्रिकेपासून निकालापर्यंत नवीन SOP अन् ५ पदरी सुरक्षा!

एनटीएने परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यासाठी नवीन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार केली आहे. यात प्रश्नपत्रिका तयार करणे, भाषांतर (Translation), छपाई, पॅकिंग, ट्रॅकिंग, परीक्षा केंद्राची सुरक्षा, परीक्षेच्या दिवशी ट्रंक उघडणे आणि निकाल तयार करण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियांचा समावेश आहे. तसेच आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी, फेस ऑथेंटिकेशन (Face Authentication), मल्टी-लेयर रिस्कींग, मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही मॉनिटरिंग आणि एआय आधारित उपकरणांचा वापर केला जात आहे. परीक्षेदरम्यान देखरेखीसाठी ‘पाच पदरी ओव्हरसाईट व्यवस्था’ लागू करण्यात आली आहे.

Web Title: Nta exam reforms supreme court affidavit cisf security ai monitoring

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • Cyber security
  • National Testing Agency
  • Paper Leak Case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.