
Image
या मोठ्या सुधारणा मोहिमेअंतर्गत NTA ने आपले कार्यालयही बदलले आहे. एनटीएचे मुख्यालय दक्षिण-पूर्व दिल्लीतील ओखला येथून हलवून नवीन दिल्लीतील मिंटो रोड येथील भारत सरकार प्रेस बिल्डिंगमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. नवीन लोकेशन आणि आधुनिक सुरक्षा व्यवस्थांसोबतच एजन्सीने देशभरातून सुमारे ५,००० शिक्षणतज्ज्ञ, वैज्ञानिक, विषय तज्ज्ञ आणि अनुवादकांचे नवीन पॅनेल तयार केले आहे. या संपूर्ण मोहिमेचा उद्देश फक्त कार्यालय बदलणे हा नसून, प्रत्येक परीक्षा पारदर्शकतेने पार पडेल याची खात्री करणे हा आहे.
‘इंडियन एक्सप्रेस’मधील वृत्तानुसार, NTA ने देशातील मोठ्या परीक्षांचे प्रश्नपत्रिका तयार करणे, त्यांची तपासणी करणे आणि त्यांच्या अनुवादाची गुणवत्ता तपासण्यासाठी ५,००० विषय तज्ज्ञांना आपल्याशी जोडले आहे. या शिक्षणतज्ज्ञ आणि वैज्ञानिकांना अत्यंत कडक अशा ४-लेव्हल व्हेरीफिकेशन प्रक्रियेतून जावे लागते. पहिल्या स्टेजमध्ये अर्जदारांचे क्रेडेंशियल्स, शैक्षणिक पात्रता आणि त्यांचा अनुभव तपासला जातो. यानंतर, एक विषय तज्ज्ञ समिती प्रत्येक उमेदवाराचा मागील रेकॉर्ड आणि पेपर तयार करण्याचा अनुभव तपासते.
UGC Net 2026: यूजीसी नेट अर्जदारांसाठी खूशखबर! करेक्शन विंडो सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करा बदल
या वर्षी मे महिन्यात नीट यूजी पेपर लीक आणि इतर गैरप्रकारांवर देशभर तीव्र निदर्शने झाली होती. त्यानंतर सरकार आणि शिक्षण मंत्रालयाने कठोर पावले उचलत NTA मधील मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले. साधारण ६०० संशयित किंवा जुन्या विषय तज्ज्ञांना बाहेर काढण्यात आले. त्या अनुभवातून शिकत आता एजन्सी एक मोठा प्रश्न बँक तयार करत आहे. या नवीन प्रणाली अंतर्गत प्रश्न इतके रँडम असतील की, कोणत्याही पेपर सेटर किंवा ट्रान्सलेटरसाठी ते आधीच लक्षात ठेवणे किंवा लीक करणे अशक्य होईल.
एनटीएच्या या मोठ्या बदलामुळे विद्यार्थी वर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. ओखला येथून मिंटो रोड येथील नवीन सरकारी कॅम्पसमध्ये शिफ्ट झाल्यापासूनच येथे सुरक्षेच्या अत्यंत कडक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. येथे सीआयएसएफच्या (CISF) पहाऱ्यात सीक्रेट डॉक्युमेंट्स ठेवले जातात. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते त्यांची छपाई आणि परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्याच्या संपूर्ण साखळीला डिजिटल आणि फिजिकल सुरक्षेच्या दुहेरी कवचात बांधण्यात आले आहे. यामुळे आगामी सत्रांमध्ये अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा वातावरण मिळेल हे निश्चित आहे.
Ans: एनटीएचे मुख्यालय दक्षिण-पूर्व दिल्लीतील ओखला येथून हलवून नवीन दिल्लीतील मिंटो रोडवरील भारत सरकार प्रेस बिल्डिंगमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.
Ans: प्रश्नपत्रिका तयार करणे आणि तपासण्यासाठी देशभरातून सुमारे ५,००० शिक्षणतज्ज्ञ, वैज्ञानिक आणि विषय तज्ज्ञांचे नवीन पॅनेल तयार करण्यात आले आहे.
Ans: तज्ज्ञांसाठी कडक ४-लेव्हल व्हेरीफिकेशन प्रक्रिया लागू करण्यात आली असून, कागदपत्रांच्या संरक्षणासाठी CISF चा पहारा आणि डिजिटल-फिजिकल सुरक्षेचे दुहेरी कवच देण्यात आले आहे.