Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्कशिट आणि सर्टिफिकेट्सची आता मिळणार एकच प्रत; हजारो विद्यार्थ्यांना होणार फायदा

निकालापूर्वीच विद्यार्थ्यांना आपल्या नावातील किंवा माहितीतील त्रुटी सुधारण्यासाठीही शेवटची संधी असणार आहे. विद्यार्थ्यांच्या नावांची आणि फोटोंची अचूकता तपासण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 31, 2026 | 01:33 PM
मार्कशिट आणि सर्टिफिकेट्सची आता मिळणार एकच प्रत; हजारो विद्यार्थ्यांना होणार फायदा

मार्कशिट आणि सर्टिफिकेट्सची आता मिळणार एकच प्रत; हजारो विद्यार्थ्यांना होणार फायदा

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपासून आता ‘गुणपत्रक’ आणि ‘प्रमाणपत्र’ ही दोन स्वतंत्र कागदपत्रे न देता, ती दोन्ही एकत्रित स्वरूपात एकाच प्रतीवर दिली जाणार आहेत. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

आतापर्यंत विद्यार्थ्यांना निकालानंतर गुणपत्रक आणि काही काळानंतर प्रमाणपत्र अशी दोन वेगळी कागदपत्रे मिळत होती. ही महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे सांभाळून ठेवताना अनेकदा विद्यार्थ्यांची मोठी कसरत व्हायची. मात्र, मंडळाच्या या ‘दोन इन एक’ धोरणामुळे भविष्यात ही कागदपत्रे जतन करणे यामुळे सोपे होणार आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया किंवा नोकरीच्या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करतानाही यामुळे सुटसुटीतपणा येणार आहे. राज्य मंडळाच्या नवीन धोरणानुसार, यावर्षी गुणपत्रकावरील विद्यार्थ्यांच्या नावाचा क्रमही बदलला जाण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, निकालापूर्वीच विद्यार्थ्यांना आपल्या नावातील किंवा माहितीतील त्रुटी सुधारण्यासाठीही शेवटची संधी असणार आहे. विद्यार्थ्यांच्या नावांची आणि फोटोंची अचूकता तपासण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्याध्यापकांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष देऊन ही माहिती तपासून घ्यावी, अशा सूचना देखील राज्य मंडळाने दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी ‘हॉल तिकीट’ तपासावे

विद्यार्थ्यांनी आपल्या हॉल तिकीटावरील नाव, आईचे नाव आणि जन्मतारीख यांची पुन्हा एकदा बारकाईने खात्री करून घ्यावी. जर हॉल तिकीटावर नावाच्या स्पेलिंगमध्ये किंवा इतर माहितीमध्ये काही चूक असेल, तर विद्यार्थ्यांनी त्वरित आपल्या शाळेशी संपर्क साधून ती दुरुस्त करून घ्यावी. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर दुरुस्तीची प्रक्रिया अधिक क्लिष्ट होऊ शकते, त्यामुळे निकालापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार असून, राज्य मंडळाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांच्या हिताचा हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याची यामुळे चर्चा सुरू आहे.

हेदेखील वाचा : MAH-MCA CET 2026: राज्यातील १८५ केंद्रांवर परीक्षा उत्साहात; ९५.८४% विद्यार्थ्यांची विक्रमी उपस्थिती; कोणतीही तक्रार नाही

Web Title: Only a single copy of marksheets and certificates will now be issued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • Education Department
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
1

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Yogesh Kadam: ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल; गृहराज्यमंत्री योगेश कदम
2

Yogesh Kadam: ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल; गृहराज्यमंत्री योगेश कदम

NHMच्या 14,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कंत्राटी कर्मचारी झाले पर्मनंट, शासन निर्णय जारी
3

NHMच्या 14,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कंत्राटी कर्मचारी झाले पर्मनंट, शासन निर्णय जारी

मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार; 5 जुलैनंतर खात्यात जमा होणार रक्कम
4

मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार; 5 जुलैनंतर खात्यात जमा होणार रक्कम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.