फोटो सौजन्य - Social Media
सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी (DDA) मार्फत मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 1732 रिक्त पदे भरली जाणार असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 6 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. अर्जदारांना अधिकृत वेबसाईट dda.gov.in वर जाऊन अर्ज करता येईल.
पदांचे तपशील
या भरतीत विविध पदांचा समावेश असून त्यात डिप्यूटी डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, असिस्टंट एग्जिक्युटिव्ह इंजिनिअर, लीगल असिस्टंट, प्लॅनिंग असिस्टंट, आर्किटेक्चर असिस्टंट, प्रोग्रामर, ज्युनियर इंजिनिअर, नायब तहसीलदार, स्टेनोग्राफर, पटवारी, ज्युनियर सचिवालय सहाय्यक, माळी तसेच मल्टी-टास्किंग स्टाफ आदी पदांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता 10वी पासपासून पदवी व पदव्युत्तर पर्यंत वेगवेगळी आहे. अभियंता पदांसाठी बीई/बीटेक असणे गरजेचे आहे. कायदा विषयासाठी LLB असणे आवश्यक आहे. स्टेनोग्राफर व सचिवालय सहाय्यकासाठी 12वी पास व टायपिंग कौशल्य असणे आवश्यक आहे. माळी व MTS साठी किमान 10वी पास अशी अट ठेवण्यात आली आहे. अधिक माहिती उमेदवारांना अधिकृत नोटिफिकेशनमध्ये मिळेल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांतून केली जाईल:
1. कंप्यूटर बेस्ड टेस्ट (CBT)
2. स्किल टेस्ट/टायपिंग/स्टेनोग्राफर टेस्ट (लागू पदांसाठी)
3. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
4. मेडिकल टेस्ट
यानंतर मेरिट यादी जाहीर केली जाईल.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:
1. अधिकृत वेबसाईट dda.gov.in वर लॉगिन करा.
2. होमपेजवरील DDA Notification 2025 तपासा.
3. ऑनलाइन अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
4. आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करा.
5. लागणारी कागदपत्रे व फोटो अपलोड करा.
6. अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट काढून ठेवा.
महत्वाच्या तारखा