Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ASCI च्या जाहिरात-साक्षरता उपक्रमातून १० लाखांहून अधिक विद्यार्थी झाले जागरूक!

Advertising Standards Council of India (एएससीआय)च्या ‘अॅडवाईज’ या जाहिरात-साक्षरता उपक्रमाने देशभरातील १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा टप्पा गाठला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 20, 2026 | 03:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • तब्बल १०,६६,३७४ विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत आयोजित सत्रांमध्ये सहभाग घेतला.
  • जाहिरातींचा उद्देश ओळखण्याची क्षमता ४३ टक्क्यांवरून ९४ टक्क्यांपर्यंत वाढली.
  • जबाबदार डिजिटल नागरिक बनण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
Advertising Standards Council of India (एएससीआय)च्या ‘अॅडवाईज’ या जाहिरात-साक्षरता उपक्रमाने देशभरातील १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. इयत्ता तिसरी ते आठवीमधील तब्बल १०,६६,३७४ विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत आयोजित सत्रांमध्ये सहभाग घेतला. हा उपक्रम उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, गुजरात, तामिळनाडूसह १३ राज्यांतील २,०६३ शाळांमध्ये राबवण्यात आला. डिजिटल माध्यमांमधील वाढत्या जाहिराती, इन्फ्लुएन्सर प्रमोशन्स आणि जाहिरातींच्या बदलत्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना जाहिरातींचा उद्देश समजावा, त्यामागील व्यावसायिक हेतू ओळखता यावा आणि चिकित्सक दृष्टी विकसित व्हावी, या उद्देशाने एएससीआय अकॅडमीने हा उपक्रम सुरू केला.

Cheapest Countries for MBBS: कमी बजेटमध्ये परदेशात एमबीबीएस करण्याचा विचार करताय? मग ‘हे’ देश आहेत तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय..

उपक्रम सुरू करण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यानंतर घेतलेल्या मूल्यमापन चाचण्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या जाहिरात-साक्षरतेत मोठी सुधारणा झाल्याचे स्पष्ट झाले. इयत्ता तिसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांमध्ये जाहिरातींचा उद्देश ओळखण्याची क्षमता ४३ टक्क्यांवरून ९४ टक्क्यांपर्यंत वाढली. तसेच जाहिरातींमधील दावे तपासून पाहण्याची सवय, जाहिरातींमागील मन वळवण्याचे तंत्र आणि जाहिरात व मूळ कंटेंट यातील फरक समजण्याची क्षमता देखील लक्षणीय वाढली.

इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांमध्येही सकारात्मक बदल दिसून आले. इन्फ्लुएन्सर प्रमोशन्स समजून घेणे, ऑनलाइन सुरक्षिततेबाबत जागरूकता आणि जाहिरातींच्या उद्देशाचे आकलन यामध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली. इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, कन्नड, तेलुगू, गुजराती आणि आसामी अशा आठ भाषांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. परस्परसंवादी वर्ग सत्रे, व्हिडिओ, उपक्रम आणि चर्चांद्वारे विद्यार्थ्यांना जाहिराती ओळखणे आणि जबाबदार डिजिटल नागरिक बनण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

NTA Reforms: नीट वादानंतर एटीएने केली ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; आता ‘AI’ने रोखली जाणार पेपरफुटी?

या उपक्रमाबद्दल बोलताना एएससीआयच्या सीईओ आणि सेक्रेटरी जनरल Manisha Kapoor म्हणाल्या, “आजच्या डिजिटल युगात जाहिरात आणि कंटेंट यामधील सीमारेषा धूसर होत आहेत. त्यामुळे मुलांमध्ये जाहिरात साक्षरता विकसित करणे अत्यंत गरजेचे आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या जागरूकतेत दुपटीने वाढ झाल्याचे समाधान आहे.” एएससीआयने भविष्यातही शाळांमध्ये जाहिरात-साक्षरतेचा प्रसार सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Web Title: Over 10 lakh students made aware through ascis advertising literacy initiative

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • ASCI

संबंधित बातम्या

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा
1

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.