फोटो सौजन्य- सोशल मीडिया
MBBS Abroad: भारतात दरवर्षी लाखो तरुण डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीट परीक्षेला बसतात. मात्र, सरकारी महाविद्यालयातील मर्यादित जागा आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची कोट्यावधी रुपयांची भरमसाठ फी यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की, जगात असे देश आहेत;जेथे वैद्याकीय शिक्षण घेणे खूप परवडणारे आहे. विशेष म्हणजे येथील पदव्या संपूर्ण जगभरात मान्य आहेत जर तुम्हालाही कमी खर्चात डॉक्टर बनायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चला तर मग जाणून घेऊया जगातील अशा सर्वात स्वस्त आणि सर्वेत्तम देशांबद्दल, जेथे भारतीय विद्यार्थी सर्वाधिक स्वस्त खर्चात एमबीबीएसचे शिक्षण घेऊ शकतात.
युरोपमधील सुंदर देश बेलारुस हा वैद्याकीय शिक्षणासाठी किफायतशीर देश आहे. येथील वैद्यकीय शिक्षणाचा एकूण खर्च 26 ते 28 लाख रुपये असतो. याशिवाय येथील राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा मासिक खर्च हा बजेट फ्रेंडली आहे. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे येथील पदवीला जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) या दोन्हीची पूर्ण मान्यता आहे, ज्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवरही कोणता प्रश्न उरत नाही.
मध्य आशियातील प्रमुख देश कझाकिस्तानदेखील भारतीय विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्यासाठी चांगले आहे, येथे एमबीबीएस (MBBS) संपूर्ण कोर्स ५ वर्षांचा असते. येथील टॉप मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना 12 वीच्या परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या मुख्य विषयांमध्ये 50 टक्के गुण मिळवणे अनिवार्य असते. येथून एमबीबीएसची पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी भारतात एफएमजीई (FMGE) परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे असते. येथे शिक्षणाचा खर्च 25 ते 26 लाख रू येतो.
परीदेशी वैद्यकीय शिक्षणाचा विचार केला, तर रशिया हा नेहमीच भारतीय विद्यार्थ्यांची पहिली पसंत आहे. येथे एमबीबीएसची कोर्स 6 वर्षाचा असतो. तसेच येथे एकूण शिक्षणाचा खर्च 29 ते 30 लाख रुपये येतो. तर चीनमध्ये सुद्धा एमबीबीएसचा कोर्स 6 वर्षाचा असतो. ज्याच्या शिक्षणाचा एकूण खर्च 29 ते 30 लाख रुपये येतो आणि विविध स्कॉलरशिपमुळे येथे शिक्षण आणखी स्वस्त होते.






