Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET 2026मध्ये पुन्हा धक्कादायक खुलासा! केमिस्ट्री, बायोलॉजीसह फिजिक्सचा पेपरही लीक

NEET paper Leak नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांना पुढील चौकशीसाठी दिल्लीहून पुण्यात आणण्यात आले आहे. सीबीआयकडून या दोघींची समोरासमोर बसवून कसून चौकशी केली जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 22, 2026 | 10:30 AM
NEET UG 2026 Physics paper leak, CBI investigation NEET security breach,

NEET UG 2026 Physics paper leak, CBI investigation NEET security breach,

Follow Us
Follow Us:
  • केमिस्ट्री आणि बायोलॉजीसोबतच फिजिक्सचा पेपरही लीक झाल्याची माहिती
  • एनटीएच्या अतिसुरक्षित पेपर-प्रिपरेशन झोनमधून हा पेपर बाहेर कसा आला?
  • सीबीआयने गुरुवारी अंबाजोगाईतील २ संशयित विद्यार्थ्यांधी दोन तास कसून चौकशी
NEET 2026 Paper Leak Latest Update: नीट यूजी २०२६ पेपर लीक प्रकरणात आता केमिस्ट्री आणि बायोलॉजीसोबतच फिजिक्सचा पेपरही लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः एनटीएने याबाबीची चौकशी करण्यासाठी सीबीआयला सांगितले. एनटीएच्या या शंकेनंतर आता पेपर लीक प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढताना दिसत आहे. परीक्षा होण्याच्या १ आठवडा आधी विद्यार्थ्यांना ३० लाख रुपयांपर्यंत विकण्यात आलेल्या ‘गेस पेपर्स’मध्ये एनटीएच्या अत्यंत गोपनीय ‘बॅकअप प्रश्नपत्रिका संचातील’ प्रश्नांचाही समावेश होता, असा संशय तपासकत्यांना आहे. लीक झालेल्या पीडीएफ फाईलमधील प्रश्नांची संख्या मूळ परीक्षेच्या तुलनेत जवळपास दुप्पट आढळल्यानंतर हा नवीन खुलासा झाला.

तपास यंत्रणांसमोर सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, एनटीएच्या अतिसुरक्षित पेपर-प्रिपरेशन झोनमधून हा पेपर बाहेर कसा आला? पेपर तयार करण्याच्या या प्रक्रियेत १२ भाषांमधील अनुवादासाठी दोन वेगवेगळ्या ट्रान्सलेटर टीम्स काम करतात, पहिली टीम पेपरचे प्रादेशिक भाषेत भाषांतर करते आणि दुसरी टीम अचूकता तपासण्यासाठी त्याचे पुन्हा इंग्रजीत भाषांतर करते. या संपूर्ण प्रक्रियेत सुमारे दोन डझन लोक सामील असतात. या त्रिस्तरीय सुरक्षेनंतरही एखाद्या व्यक्तीने संपूर्ण सिस्टम पणाला लावली, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

NEET Paper Leak : नीट पेपर लीकचे पुणे ते राजस्थान कनेक्शन; ‘ब्लँक चेक …

काँग्रेसचे आंदोलन; शेकडो कार्यकर्त्यांवर लाठीमार

राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी जयपूरमध्ये या मुद्द्यावरून आंदोलन करण्यात आले. पीसीसी प्रमुख गोविंद सिंह डोटासरा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते पीसीसी मुख्यालयातून भाजप मुख्यालयाला वेढा घालण्यासाठी निघाले होते. परंतु पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना आंदोलकांवर पाण्याचा मारा करत लाठीमार करावा लागला.

टेलीग्रामवर होणार कारवाई

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी नीट तयारीचा फेरपरीक्षेच्या आढावा घेतला. त्यांनी बनावट टेलिग्राम चॅनेल्स आणि सोशल मीडियावर पेपर लीकशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. दुसऱ्या एका बैठकीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा, गुगल आणि टेलिग्रामच्या प्रतिनिधींना स्पर्धा परीक्षांशी संबंधित खोटी माहिती व्हायरल करण्याबाबत कडक इशारा देण्यात आला आहे.

NEET Paper Leak : नीट पेपर लीकचे पुणे ते राजस्थान कनेक्शन; ‘ब्लँक चेक …

मुलासाठी खरेदी केला पेपर; डॉक्टरला अटक

सीबीआयने लातूरमधून बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरूरे यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात लातूरमधून झालेली ही तिसरी अटक आहे. तपासादरम्यान समोर आले की, डॉ. शिरूरे याचा आधी अटक करण्यात आलेले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पी. व्ही. कुलकणी आणि मुख्य आरोपी संजय मोटेगावकर यांच्याशी थेट संपर्क होता. विशेष बाब म्हणजे, या संपूर्ण पेपर लीक प्रकरणात एखाद्या विद्यार्थ्यांच्या पालकाला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कारवाईमुळे शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

दोन्ही मनीषा समोरासमोर येणार

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांना पुढील चौकशीसाठी दिल्लीहून पुण्यात आणण्यात आले आहे. सीबीआयकडून या दोघींची समोरासमोर बसवून कसून चौकशी केली जात आहे. माढरे आणि वाघमारे या पुण्यातील सुखसागर नगर भागातील एकाच इमारतीत राहत होत्या. वाघमारे यांच्या ‘ब्युटी पार्लर ‘मधूनच नीट पेपर लीकचा कट रचला गेला असावा, असा संशय तपास यंत्रणाना आहे.

अंबाजोगाईत दोन विद्यार्थ्यांची चौकशी

सीबीआयने गुरुवारी अंबाजोगाईतील २ संशयित विद्यार्थ्यांधी दोन तास कसून चौकशी केली, हे विद्यार्थी लातूर येथे राहून नीट परीक्षेची तयारी करत होते, या दोन्ही विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच गैरमार्गाने किंवा आर्थिक व्यवहारातून नीटचा पेपर मिळवल्याचा सीबीआयला संशय आहे. सीबीआयने दोन्ही विद्याथ्यांचे मोबाईल फोन आणि मेमरी कार्ड ताब्यात घेतले आहे. त्यामधील डिजिटल डेटा, चॅट्स आणि कॉल रेकॉर्डच्याआधारे या संशयाची पडताळणी केली जात आहे.

 

 

 

 

 

Web Title: Physics question paper was also leaked along with chemistry and biology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • CBI
  • NEET exam scam
  • Paper Leak Case

संबंधित बातम्या

Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान
1

Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.