Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली फास्ट ट्रॅक कोर्टबाबत मोठी घोषणा! Fast Track Court म्हणजे नेमकं काय?

NEET Paper Leak Fast Track Court: नीट पेपर फुटीतील दोषींना त्वरित शिक्षेसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत काय माहिती दिली? वाचा सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 23, 2026 | 11:14 AM
fast

fast

Follow Us
Follow Us:

NEET Paper Leak Fast Track Court:  ‘देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पेपर फुटीच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी आणि खटल्यांचा वेगाने निपटारा व्हावा, यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केले जातील. संबंधित विभागाने आवश्यक कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांच्या मालिकेत हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घातले जाणार नाही.’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून ट्विट करत स्पष्ट केले आहे.

नीट पेपर फुटी प्रकरणात विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या खटल्यांची सुनावणी वेगाने केली जाईल आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, जेणेकरून दोषींना लवकरात लवकर शिक्षा होईल आणि विद्यार्थ्यांना न्यायासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागणार नाही, असे त्यांनी सांगितले. परंतू तुम्हाला माहिती आहे का की, फास्ट ट्रॅक कोर्ट नेमकी काय संकल्पना आहे. चला तर मग जाणून घेऊया..

फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय?

फास्ट ट्रॅक कोर्ट ही अशी विशेष अदालत आहे, जी प्रामुख्याने विशिष्ट प्रकरणांची जलद सुनावणी आणि वेळेत निकाल देण्यासाठी स्थापन केली जाते. ज्या प्रकरणांमध्ये विलंबाने अन्याय होऊ शकतो, अशा खटल्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात प्राधान्य दिले जाते. सामान्य न्यायालयांप्रमाणेच येथेही तेच कायदे आणि न्यायिक प्रक्रिया लागू होते, परंतु सुनावणीचा वेग वाढवण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाते.

पेपर फुटी प्रकरणांमध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट का आवश्यक?

नुकत्याच झालेल्या नीट (NEET), भरती परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटीच्या आरोपांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य प्रभावित झाले आहे. अनेकदा अशा प्रकरणांचा तपास आणि न्यायालयीन लढाई वर्षानुवर्षे चालते. फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी झाल्यास:

  • दोषींना त्वरित शिक्षा मिळू शकेल.
  • विद्यार्थ्यांचा परीक्षा पद्धतीवरील विश्वास पुन्हा दृढ होईल.
  • भविष्यात पेपर फुटीसारख्या घटनांना आळा घालण्यास मदत होईल.

भारतात एकूण किती फास्ट ट्रॅक कोर्ट आहेत?

कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या माहितीनुसार, ३१ जानेवारी २०२६ पर्यंत भारतातील २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ८६२ फास्ट ट्रॅक कोर्ट कार्यरत आहेत. यांपैकी सर्वाधिक ३७३ फास्ट ट्रॅक कोर्ट एकट्या उत्तर प्रदेशात आहेत. याशिवाय महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्ली या राज्यांमध्येही मोठ्या संख्येने फास्ट ट्रॅक न्यायालये उपलब्ध आहेत.

NEET Paper Leak: गेल्या १० वर्षात १५२ पेपर लीक; पंतप्रधान माफी मागणार का? राहुल गांधींचा थेट प्रश्न!

फास्ट ट्रॅक कोर्टात न्यायाधीश कोण असतात?

फास्ट ट्रॅक कोर्टात स्वतंत्रपणे वेगळे न्यायाधीश नियुक्त केले जात नाहीत. नियमित न्यायालयीन सेवेतील अनुभवी न्यायिक अधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश या न्यायालयांचे कामकाज पाहतात. त्यांच्याकडे या विशेष खटल्यांचा वेगाने निपटारा करण्याची अतिरिक्त जबाबदारी दिलेली असते.

फास्ट ट्रॅक कोर्टात किती वेगाने सुनावणी होते?

फास्ट ट्रॅक कोर्टाचा मुख्य उद्देशच प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा करणे हा आहे. यासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा कायद्यात ठरवून दिलेली नसली, तरी सामान्यतः ३० दिवस, ६० दिवस किंवा ९० दिवसांच्या आत अशा खटल्यांची सुनावणी पूर्ण केली जाते. त्यामुळे नीट पेपर फुटी प्रकरणाची सुनावणीही कमीत कमी दिवसांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

NTA Recruitment: नीट वादानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये ‘या’ पदांची भरती; ७ ऑगस्टपूर्वी असा करा अर्ज

NEET प्रकरणांसाठी स्वतंत्र कोर्ट बनणार का?

पेपर फुटीच्या खटल्यांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केले जातील, अशी घोषणा सरकारने केली आहे. मात्र, ही पूर्णपणे नवीन न्यायालये असतील की सध्या अस्तित्वात असलेल्या फास्ट ट्रॅक कोर्टांकडेच ही जबाबदारी दिली जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे लवकरच समोर येतील.

Web Title: Pm modi announces fast track court for neet paper leak case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • NEET Exam
  • NEET Re-Exam

संबंधित बातम्या

NEET PG 2026 च्या गोपनीयतेचा भंग केल्यास कडक कारवाई; परीक्षेच्या ‘या’ नियमांचे पालन करावे लागणार?
1

NEET PG 2026 च्या गोपनीयतेचा भंग केल्यास कडक कारवाई; परीक्षेच्या ‘या’ नियमांचे पालन करावे लागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.