फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NTA Recruitment 2026: देशभरातील विविध प्रवेश परीक्षांचे आयोजन करणारी संस्था ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) सध्या प्रचंड चर्चेत आहे. जेईई मेन, यूजीसी, सीयूईटी आणि नेट यांसारख्या मोठ्या परीक्षांसोबतच ‘नीट’ परीक्षेचे आयोजन करण्यासाठी ही एजन्सी ओळखली जाते. मात्र, नीट पेपर फुटीच्या वादानंतर एनटीएच्या परीक्षा पद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्व वादांच्या पार्श्वभूमीवर, एनटीएने विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
एनटीएने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून दिलेल्या माहितीनुसार, डेप्युटी डायरेक्टर, जॉइंट डायरेक्टर आणि रिसर्च सायंटिस्ट यांसारख्या उच्च अधिकारी स्तरावरील पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ७ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. चला तर मग, या भरतीची पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार एनटीएच्या अधिकृत वेबसाईट nta.ac.in वर जाऊन या भरतीची अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. अर्जाची लिंक ७ ऑगस्टपर्यंतच उघडी राहील, त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
NEET Paper Leak: गेल्या १० वर्षात १५२ पेपर लीक; पंतप्रधान माफी मागणार का? राहुल गांधींचा थेट प्रश्न!
| पद | एकूण रिक्त जागा |
|---|---|
| सिनिअर सुपरिंटेंडंट / सिनिअर सुपरिंटेंडंट (अकाउंट्स) (ग्रुप बी) | ०१ |
| असिस्टंट डायरेक्टर (ग्रुप ए) | ०२ |
| रिसर्च सायंटिस्ट सी (ग्रुप ए) | ०१ |
| डेप्युटी डायरेक्टर (ग्रुप ए) | ०२ |
| जॉइंट डायरेक्टर (ग्रुप ए) | ०३ |
| एकूण | ०९ |
जॉइंट डायरेक्टर : पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार मूळ कॅडर किंवा विभागात कार्यरत असावा. तसेच ३ ते ५ वर्षांचा अनुभव किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
रिसर्च सायंटिस्ट : गणित, सायकॉलॉजी, टेस्टिंग मेथडॉलॉजी, सायकोमेट्रिक, सांख्यिकी किंवा शिक्षण क्षेत्रात पदवी आणि पीएचडी पदवी असणे अनिवार्य आहे. सोबतच १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
डेप्युटी डायरेक्टर : पदवी आणि संबंधित क्षेत्रातील कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
असिस्टंट डायरेक्टर : पदवी उत्तीर्ण, ३ ते ५ वर्षांचा अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
सिनिअर सुपरिंटेंडंट (अकाउंट्स): पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अकाउंट्स, स्टोअर मॅनेजमेंट, ऑडिट, लीगल किंवा प्रशासकीय क्षेत्रात कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
| पदाचे नाव | वेतन श्रेणी (Pay Level & Salary) |
|---|---|
| सिनिअर सुपरिंटेंडंट / सिनिअर सुपरिंटेंडंट (अकाउंट्स) | पे-लेव्हल ७ (₹४४,९०० ते ₹१,४२,४००) |
| असिस्टंट डायरेक्टर | पे-लेव्हल १० (₹५६,१०० ते ₹१,७७,५००) |
| रिसर्च सायंटिस्ट सी | पे-लेव्हल १२ (₹७८,८०० ते ₹२,०९,२००) |
| डेप्युटी डायरेक्टर | पे-लेव्हल ११ (₹६७,७०० ते ₹२,०८,७००) |
| जॉइंट डायरेक्टर | पे-लेव्हल १२ (₹७८,८०० ते ₹२,०९,२००) |
एनटीएतर्फे या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया लागू करण्यात आली आहे.
१. उमेदवारांना त्यांचा अर्ज आणि सिव्ही खालील पत्यावर पाठवावा लागेल:
पत्ता: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA), पहिला मजला, एमडीबीपी इमारत, ओखला इंडस्ट्रियल इस्टेट, नवी दिल्ली – ११००२०.
२. अर्जाचा नमुना एनटीएच्या संकेतस्थळावर Annexure-II मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे, तो डाऊनलोड करून भरावा लागेल.
३. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून ७ ऑगस्टपूर्वी स्पीड पोस्टद्वारे पाठवणे अनिवार्य आहे.
४. याशिवाय, भरलेला अर्ज आणि सर्व कागदपत्रे dir-admin@nta.gov.in या अधिकृत ई-मेल आयडीवर देखील पाठवणे आवश्यक आहे.
५. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी एनटीएच्या nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.






