Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Narendra Modi: पंतप्रधानांच्या हस्ते IIT दिल्लीत ‘परम प्रज्ञा’ सुपरकंप्यूटर लॉन्च; काय आहेत याची वैशिष्ट्ये? जाणून घ्या

PM Narendra Modi IIT Delhi convocation : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयआयटी दिल्लीच्या सोनीपत कॅम्पसमध्ये 'परम प्रज्ञा' या शक्तिशाली AI सुपरकंप्यूटरचे उद्घाटन करण्यात आले आहे. या सुपरकंप्यूटरची वैशिष्ट्ये आणि सविस्तर वाचा..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 08, 2026 | 10:11 AM
param pradya

param pradya

Follow Us
Follow Us:

PM Narendra Modi IIT Delhi convocation : देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी दिल्लीच्या ५७ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य पाहुणे म्हणून हजेरी लावली आहे. या समारंभात पंतप्रधान मोदींनी ३,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या, ज्यामध्ये ५८७ पीएचडी संशोधकांचाही समावेश आहे. यासोबतच, पंतप्रधानांच्या हस्ते आयआयटी दिल्लीच्या सोनीपत कॅम्पसमध्ये स्थापित ‘परम प्रज्ञा’ या सुपरकंप्यूटरचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील संशोधनाला चालना देण्यासाठी आणि प्रगत संगणकीय वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयआयटी दिल्लीने हे पाऊल उचलले आहे. या वेळच्या दीक्षांत समारंभात ‘परम प्रज्ञा’ हे मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. चला तर मग जाणून घेऊया, परम प्रज्ञा म्हणजे काय, तो का खास आहे आणि आयआयटी दिल्लीला त्याची गरज का भासली?

परम प्रज्ञा म्हणजे काय?

परम प्रज्ञा हा एक AI-आधारित हाय-परफॉर्मन्स सुपरकंप्यूटर म्हणजेच HPC सिस्टम आहे. सामान्य संगणकाप्रमाणे तो रोजच्या कामासाठी बनवलेला नाही. याचा वापर मोठ्या प्रमाणावर डेटा, क्लिष्ट मोजणी (जटिल गणना) आणि उच्च-स्तरीय वैज्ञानिक व तंत्रज्ञान संशोधनासाठी केला जाईल. सोप्या शब्दात सांगायचे तर, जसे सामान्य संगणक एखाद्या कामाला प्रोसेसरच्या मदतीने करतो, अगदी तसाच हा सुपरकंप्यूटर प्रचंड संगणकीय क्षमतेचा वापर करून एकाच वेळी मोठ्या संख्येने गणना करू शकतो. त्यामुळे अशा सिस्टीमचा वापर त्या कामांसाठी केला जातो जिथे प्रचंड डेटा आणि कॉम्प्युटिंग पॉवरची गरज असते.

AI साठी असा सुपरकंप्यूटर का गरजेचा झाला आहे?

आजचे प्रगत AI आणि LLM मॉडेल्स मागील मॉडेल्सच्या तुलनेत खूप मोठे आणि क्लिष्ट झाले आहेत. म्हणूनच त्यांना चालवण्यासाठी ‘परम प्रज्ञा’सारखे सुपरकंप्यूटर अत्यंत आवश्यक बनले आहेत:

विशाल डेटा प्रोसेसिंग: नवीन AI मॉडेल्सना ट्रेन करण्यासाठी पेटाबाइट्समध्ये डेटाची आवश्यकता असते. सामान्य सर्व्हरला जो डेटा प्रोसेस करण्यासाठी महिने लागू शकतात, तोच डेटा हा सुपरकंप्यूटर अगदी कमी वेळेत पूर्ण करतो.

Kotak Kanya Scholarship: कोटक एज्युकेशन फाऊंडेशनकडून ‘या’ विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती जाहीर; जाणून घ्या पात्रता!

अब्जावधी मॅथेमॅटिकल कॅलक्युलेशन: AI पॅटर्न ओळखण्यासाठी एकाच वेळी अब्जावधी क्लिष्ट समीकरणे सोडवतो. ‘परम प्रज्ञा’मध्ये असलेले शक्तिशाली GPUs आणि एक्सीलेटर या AI अल्गोरिदमना विलक्षण वेग प्रदान करतात.

गंभीर संशोधन आणि प्रोजेक्ट्स: औषधांचा शोध, हवामान आणि चक्रीवादळाचा अचूक अंदाज, कर्करोग संशोधन (कॅन्सर रिसर्च) आणि स्मार्ट कृषी (स्मार्ट एग्रीकल्चर) यांसारख्या क्लिष्ट AI प्रकल्पांसाठी हा सुपरकंप्यूटर अतिशय शक्तिशाली ठरेल. या HPC सिस्टममध्ये अनेक प्रोसेसिंग युनिट्स एकत्र येऊन काम करतात.

भारतात आतापर्यंत किती सुपरकंप्यूटर बसवण्यात आले आहेत?

नॅशनल सुपरकंप्युटिंग मिशन (NSM) अंतर्गत भारतात आतापर्यंत ३७ सुपरकंप्यूटर बसवण्यात आले आहेत. देशातील प्रमुख IITs, IISc, IISER, NIT, C-DAC आणि इतर संशोधन संस्थांमध्ये हे सुपरकंप्यूटर बसवले गेले आहेत. यामध्ये परम सिद्धी (पुणे), परम रुद्र (नवी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई), परम संगणक (IIT कानपूर), परम प्रवेग (IISc बंगळुरू), परम सेवा (IIT हैदराबाद), परम शिवाय (IIT-BHU, वाराणसी), परम शक्ती (IIT खडकपूर), परम ब्रह्मा (पुणे), परम युक्ती (बंगळुरू) आणि इतर प्रमुख सुपरकंप्यूटर्सचा समावेश आहे.

AI in Management Education: एआयच्या युगात व्यवस्थापन शिक्षणात कसे बदल होत आहेत? जाणून घ्या सविस्तर!

आयआयटी दिल्लीमध्ये या सुपरकंप्यूटरचा वापर कुठे केला जाईल?

परम प्रज्ञा सुपरकंप्यूटरचा वापर केवळ AI संशोधनापुरता मर्यादित राहणार नाही, तर तो विविध क्षेत्रांमधील संशोधनाला शक्तिशाली कॉम्प्युटिंग सपोर्ट देखील प्रदान करेल. याचा वापर अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग), कॉम्प्युटर सायन्स, हेल्थकेयर, ऊर्जा (एनर्जी) आणि अत्याधुनिक इनोव्हेशन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये केला जाईल.

Web Title: Pm narendra modi param pragya supercomputer iit delhi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 10:11 AM

Topics:  

  • ai
  • Computers
  • IIT
  • narendra modi

संबंधित बातम्या

मोदी-शहा भेटीमागचं खरं कारण काय? सुनील तटकरेंचा मोठा खुलासा, राजकीय भेटींमुळे तर्कवितर्कांना उधाण
1

मोदी-शहा भेटीमागचं खरं कारण काय? सुनील तटकरेंचा मोठा खुलासा, राजकीय भेटींमुळे तर्कवितर्कांना उधाण

AI Study Tricks: नोट्स शोधणे आणि स्टडी प्लॅन बनवण्यात वेळ जातोय? मग ‘या’ ३ एआय ट्रिक्समुळे अभ्यास होईल अगदी सोपा!
2

AI Study Tricks: नोट्स शोधणे आणि स्टडी प्लॅन बनवण्यात वेळ जातोय? मग ‘या’ ३ एआय ट्रिक्समुळे अभ्यास होईल अगदी सोपा!

Samsung ची मोठी घोषणा! शून्य डाऊन पेमेंट, ३० महिन्यांचा EMI; Samsung Galaxy Z Series आता अधिक परवडणारी
3

Samsung ची मोठी घोषणा! शून्य डाऊन पेमेंट, ३० महिन्यांचा EMI; Samsung Galaxy Z Series आता अधिक परवडणारी

AI Data Centers : भारतामध्ये किती आहेत डेटा सेंटर? ‘या’ टेक कंपन्या करत आहेत भारतात मोठी गुंतवणूक; जाणून घ्या सविस्तर..
4

AI Data Centers : भारतामध्ये किती आहेत डेटा सेंटर? ‘या’ टेक कंपन्या करत आहेत भारतात मोठी गुंतवणूक; जाणून घ्या सविस्तर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.