Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NMIMS Vice Chancellor: प्रा. सौगत रे यांची एनएमआयएमएस विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती!

NMIMS Vice Chancellor Prof Saugata Roy: साडेतीन दशकांहून अधिक समृद्ध अनुभव असलेले शिक्षणतज्ज्ञ प्रा. सौगत रे यांची एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएस (NMIMS) विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 21, 2026 | 12:43 PM
re

re

Follow Us
Follow Us:

NMIMS Vice Chancellor Prof Saugata Roy: एसव्हीकेएमच्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS) या डीम्ड-टू-बी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. सौगत रे यांची नियुक्ती करण्यात आली.

व्यवस्थापन शिक्षण, धोरणात्मक नेतृत्व, नवोपक्रम, उद्योजकता आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स या क्षेत्रात साडेतीन दशकांहून अधिक अनुभव असलेले प्रा. रे हे शिक्षण क्षेत्रातील एक मान्यवर नाव आहे. त्यांनी शैक्षणिक नेतृत्व आणि संस्था बांधणीत उल्लेखनीय योगदान दिले आहे.

प्रा. रे यांची कामगिरी

एनएमआयएमएसमध्ये रुजू होण्यापूर्वी ते इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (ISB) येथे थॉमस श्मिडहायनी चेअर्ड प्रोफेसर ऑफ स्ट्रॅटेजी अँड एंटरप्रेन्युअरशिप प्रॅक्टिस तसेच थॉमस श्मिडहायनी सेंटर फॉर फॅमिली एंटरप्राइजचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कलकत्ता (IIM Calcutta) येथे प्रोफेसर ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, डीन आणि बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सदस्य म्हणून विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.

तसेच इन्फोसिस टेक्नॉलॉजीजच्या इनोव्हेशन लॅबमध्ये जनरल मॅनेजर म्हणूनही त्यांनी काम केले आहे. उद्योजक, उद्योग क्षेत्रातील नेते, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि सार्वजनिक संस्थांना त्यांनी धोरण, गव्हर्नन्स, नवोपक्रम आणि डिजिटल परिवर्तन या विषयांवर मार्गदर्शन केले आहे.

प्रा. रे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त संशोधक आहेत. धोरण, नवोपक्रम, उद्योजकता, डिजिटल परिवर्तन आणि कौटुंबिक उद्योग या विषयांवर त्यांचे संशोधन असून त्यांनी जवळपास २०० संशोधन निबंध, लेख, पुस्तके आणि केस स्टडीज प्रकाशित केल्या आहेत. तसेच IIM इंदूर, IIM कलकत्ता आणि ISB या संस्थांच्या विकासातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, शिबपूरचे माजी विद्यार्थी आहेत.

National Student Laptop Scheme: व्हॉट्सअ‍ॅपवर फ्री लॅपटॉपचा मेसेज आलाय? PIB कडून करण्यात आलेला खुलासा लगेच वाचा

नाविण्यपूर्ण उपक्रमाला चालना मिळणार

एनएमआयएमएसच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांची ही नियुक्ती झाली आहे. शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता आणि जागतिक सहकार्य अधिक मजबूत करण्यावर विद्यापीठाचा भर आहे. प्रा. रे हे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित, नवोपक्रमाला प्रोत्साहन देणारे आणि जागतिक स्तरावरील उच्च शिक्षणाचे व्हिजन घेऊन एनएमआयएमएसमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली एनएमआयएमएसमध्ये आंतरशाखीय शिक्षण, उद्योग क्षेत्राशी सहकार्य, जागतिक भागीदारी आणि भविष्यासाठी सक्षम शिक्षणाला अधिक चालना मिळेल.

Indian Army Rules: भारतीय सैन्यात अधिकारी बनणे होणार सोपे! ‘या’ राष्ट्रीय परीक्षांच्या रँकनुसार थेट ऑफिसर बनण्याची संधी

या नियुक्तीबाबत प्रा. सौगत रे म्हणाले, “भारतातील अग्रगण्य आणि प्रतिष्ठित शिक्षणसंस्थांपैकी एक असलेल्या एनएमआयएमएसचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. प्राध्यापक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, उद्योग क्षेत्रातील भागीदार आणि संपूर्ण शैक्षणिक परिसंस्थेसोबत काम करत नवोपक्रम, आंतरशाखीय शिक्षण आणि समाजाभिमुख उपक्रमांना चालना देण्याची माझी इच्छा आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आणि सर्वसमावेशक भविष्यासाठी सक्षम नेतृत्व घडविण्यावर आमचा भर असेल.”

नियुक्तीबाबत कुलपती श्री. अमरीश आर. पटेल म्हणाले, “प्रा. रे यांचे शैक्षणिक योगदान, प्रभावी नेतृत्व आणि संस्थाबांधणीचा समृद्ध अनुभव पाहता, एनएमआयएमएसला पुढील वाढ, विस्तार आणि शैक्षणिक उत्कृष्टतेच्या नव्या टप्प्यावर नेण्यासाठी ते योग्य नेतृत्व देतील, असा आम्हाला विश्वास आहे.”

Web Title: Prof saugata roy appointed nmims vice chancellor university mumbai 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • education

संबंधित बातम्या

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
1

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

Purnima vs Teachers Day Difference:  गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या
2

Purnima vs Teachers Day Difference: गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या

Indian Army Success Story : ॲमेझॉनमधील ४६ लाखांचे पॅकेज सोडले अन् धरली सैन्याची वाट; ८ व्या प्रयत्नात मिळवले भारतीय सैन्यात यश
3

Indian Army Success Story : ॲमेझॉनमधील ४६ लाखांचे पॅकेज सोडले अन् धरली सैन्याची वाट; ८ व्या प्रयत्नात मिळवले भारतीय सैन्यात यश

Dr. Sarvepalli Radhakrishnan Education: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण किती झाले होते? जाणून घ्या एका क्लिकवर
4

Dr. Sarvepalli Radhakrishnan Education: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण किती झाले होते? जाणून घ्या एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.