Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Project Umang : वर्गाबाहेरचं शिक्षण, स्वप्नांना नवी दिशा! वाड्यातील 1,800 विद्यार्थ्यांसाठी ‘प्रोजेक्ट उमंग’

Project Umang : विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासह त्यांच्यात करिअरविषयक जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने लिओ डिस्ट्रिक्टच्या वतीने वाडा येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये 'प्रोजेक्ट उमंग'चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात 200 हून अधिक लिओ क्लब सदस्य सहभागी झाले होते.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 18, 2026 | 02:38 PM
Project Umang : वर्गाबाहेरचं शिक्षण, स्वप्नांना नवी दिशा! वाड्यातील 1,800 विद्यार्थ्यांसाठी 'प्रोजेक्ट उमंग'

Project Umang : वर्गाबाहेरचं शिक्षण, स्वप्नांना नवी दिशा! वाड्यातील 1,800 विद्यार्थ्यांसाठी 'प्रोजेक्ट उमंग'

Follow Us
Follow Us:
  • 200 हून अधिक लिओ सदस्यांचा सहभाग
  • करिअर मार्गदर्शन आणि आर्थिक साक्षरतेवर भर
  • वाडा परिसरातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडणार
 

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासह त्यांच्यात करिअरविषयक जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने लिओ डिस्ट्रिक्ट 3231-A2 (सेंट्रल मुंबई) यांच्या वतीने वाडा येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘प्रोजेक्ट उमंग’चे (Project Umang)आयोजन करण्यात आले. या उपक्रमात 200 हून अधिक लिओ क्लब सदस्य सहभागी झाले होते. त्यांच्या माध्यमातून इयत्ता पाचवी ते बारावीतील १,८०० हून अधिक विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षणाच्या विविध उपक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळाली.

लायन्स इंटरनॅशनलची युवा शाखा असलेल्या लिओ डिस्ट्रिक्ट 3231-A2 च्या जिल्हा अध्यक्ष लिओ इशिका शाह यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. नियमित वर्गातील शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावे, तसेच त्यांची सर्जनशीलता आणि भविष्यातील संधींबाबतची समज वाढावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
विशेषतः इयत्ता नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करण्यावर भर देण्यात आला.

कला व टिश्यू पेंटिंग कार्यशाळा

लायन्स क्लब्स इंटरनॅशनल फाउंडेशन (LCIF) यांच्या सेवा अनुदानातून आणि कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत सहकार्य करणाऱ्या संस्थांच्या मदतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी कला व टिश्यू-पेंटिंग कार्यशाळा, थ्री-D पेनच्या साहाय्याने कलाकृती तयार करणे, डोम प्लॅनेटेरियम, ड्रोन निर्मिती, एस्केप रूम आणि विविध मॉडेल तयार करण्यासारखे उपक्रम राबवण्यात आले.
याशिवाय निबंधलेखन, शांतता पोस्टर आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. करिअर समुपदेशन, करिअरविषयक जागरूकता आणि आर्थिक साक्षरता या विषयांवरील सत्रांचाही विद्यार्थ्यांना लाभ झाला.

शिक्षणासोबत मनोरंजन आणि आनंदाची जोड देण्यासाठी सहभागी विद्यार्थ्यांना चीज पावभाजी देण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत 200 हून अधिक लिओ सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांशी संवाद, विविध उपक्रमांचे समन्वयन आणि कार्यक्रमाचे व्यवस्थापन अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.

SSC Exam Tips: भरपूर अभ्यास करूनही निकाल येत नाहीये? ९०% विद्यार्थी ‘या’ ५ चुकांमुळे होतात नापास!

वाडा परिसरातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडणार

प्रोजेक्ट डायरेक्टर लिओ लायन सचिन तेलवणे म्हणाले, उमंग हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम असावा, असा आमचा उद्देश कधीच नव्हता. प्रत्येक मुलाने येथून एक नवीन विचार, एक नवीन अनुभव आणि स्वतःवरील थोडा अधिक विश्वास घेऊन जावे, अशी आमची इच्छा होती.
उमंगमुळे एक जरी मूल मोठी स्वप्ने पाहण्यास, वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास आणि अधिक चांगले भविष्य घडवण्याची क्षमता स्वतःमध्ये आहे, यावर विश्वास ठेवण्यास प्रेरित झाले असेल, तर आमचा उद्देश सफल झाला असल्याचे तेलवणे म्हणाले.

वाडा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यात अशाच शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी ‘प्रोजेक्ट उमंग’ मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना नव्या संधींची ओळख करून देण्यासोबतच युवा सदस्यांना सामाजिक बांधिलकीतून व्यापक स्तरावर सेवाभावी उपक्रम राबवण्यासाठी प्रेरित करणे, हाही या प्रकल्पाचा उद्देश आहे.

Board Exam Preparation Tips: बोर्ड परीक्षेची तयारी कशी करावी? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करून मिळवा घवघवीत यश

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रोजेक्ट उमंगचे आयोजन कुठे करण्यात आले?

    Ans: वाडा येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रोजेक्ट उमंगचे आयोजन करण्यात आले.

  • Que: या उपक्रमाचा किती विद्यार्थ्यांना लाभ झाला?

    Ans: इयत्ता पाचवी ते बारावीतील १,८०० हून अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला.

  • Que: प्रोजेक्ट उमंगमध्ये कोणते उपक्रम राबवण्यात आले?

    Ans: कला व टिश्यू-पेंटिंग कार्यशाळा, 3D पेन, डोम प्लॅनेटेरियम, ड्रोन निर्मिती, एस्केप रूम, मॉडेल तयार करणे, निबंधलेखन, शांतता पोस्टर आणि वक्तृत्व स्पर्धा असे उपक्रम राबवण्यात आले.

Web Title: Project umang wada 1800 students experiential learning rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Digital School
  • Student

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.