बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 195 पदांसाठी भरती; 'ही' असेल अर्ज करण्याची शेवटची तारीख!
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गतविविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकात्मिक जोखीम व्यवस्थापन, फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी / डिजिटल बँकिंग / सीआयएसओ / सीडीओ, इतर विभाग पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून एकूण 195 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे या पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव : बँक ऑफ महाराष्ट्र
कोणती पदे भरली जाणार?
– एकात्मिक जोखीम व्यवस्थापन
– फॉरेक्स आणि ट्रेझरी
– आयटी / डिजिटल बँकिंग / सीआयएसओ / सीडीओ
– इतर विभाग
एकूण रिक्त पदे : 195 पदे
वयोमर्यादा : 50 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005
कसा कराल अर्ज?
– बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गतविविध रिक्त पदांकरिता उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
– अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्र जोडावे.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 असणार आहे.
– उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा : https://bankofmaharashtra.in/writereaddata/documentlibrary/3b60f7a0-c894-43a0-9ec3-3a7bdf5df502.pdf
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://bankofmaharashtra.in/ ला भेट द्या.