फोटो सौजन्य - Social Media
पंजाब अँड सिंध बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल II (MMGS II) अंतर्गत ही भरती नियमित पद्धतीने होणार असून, बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. एकूण १९० पदे उपलब्ध असून त्यात क्रेडिट मॅनेजरची १३० व अॅग्रीकल्चर मॅनेजरची ६० पदे आहेत. ही जाहिरात १८ सप्टेंबर २०२५ रोजी पंजाब अँड सिंध बँकेच्या मानव संसाधन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली.
अर्ज प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १९ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाली असून उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२५ आहे. अर्ज फक्त बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (punjabandsindbank.co.in) स्वीकारले जातील.
शैक्षणिक पात्रता व अनुभव
वयोमर्यादा (१ सप्टेंबर २०२५ रोजी):
किमान वय २३ वर्षे, कमाल वय ३५ वर्षे. आरक्षण प्रवर्गासाठी शिथिलता – SC/ST: ५ वर्षे, OBC (NCL): ३ वर्षे, PwBD: १० वर्षे, माजी सैनिक/१९८४ दंगलग्रस्त: ५ वर्षे.
निवड प्रक्रिया
भरतीची प्रक्रिया चार टप्प्यांत होईल. ऑनलाईन लेखी परीक्षा, स्क्रीनिंग, वैयक्तिक मुलाखत आणि अंतिम गुणवत्ता यादी. लेखी परीक्षेत १०० प्रश्न (१०० गुण) असतील. अंतिम गुणवत्ता यादीत लेखी परीक्षेला ७०% व मुलाखतीला ३०% गुणांचे वजन असेल.
परीक्षा पद्धत
इंग्रजी भाषा विषयाची परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये २० प्रश्न असतील २० गुणांसाठी! १५ मिनिटांसाठी परीक्षा असेल तर सामान्य ज्ञानासंबंधित परीक्षेत ३० मिनिटे वेळ दिला जाईल. २० प्रश्न असतील २० गुणांसाठी!
६० मिनिटांसाठी प्रोफेशनल नॉलेज विषयाची परीक्षा होईल तर यात ६० प्रश्न ६० गुणांसाठी विचारले जातील. एकूण १०० प्रश्न असतील १०० गुणांसाठी! उमेदवारांना १०५ मिनिटे वेळ परीक्षेसाठी दिला जाईल. किमान पात्रता गुण सामान्य/EWS साठी ४०%, तर राखीव प्रवर्गासाठी ३५% निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज शुल्क