फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजारात Hyundai Creta गेल्या दशकभरापासून मिड-साईज SUV सेगमेंटची बादशाह राहिली आहे, पण 2026 मध्ये याच कारला दमदार टक्कर मिळू शकते. कारण, तीन नवीन SUVs – Tata Sierra, New Gen Kia Seltos आणि New Renault Duster मार्केटमध्ये येण्यास तयार आहेत. ज्या Creta ला थेट स्पर्धा देतील. चला या कार्सच्या फीचर्सवर नजर टाकूया.
Tata Motors आपली आयकॉनिक Tata Sierra ला 2026 मध्ये नवीन अवतारात लाँच करणार आहे. सुरुवातीला या कारचा Electric Version बाजारात येईल, ज्यामध्ये दोन Battery Pack Options असतील आणि रेंज 500 किलोमीटर पेक्षा जास्त असेल. त्यानंतर कंपनी पेट्रोल आणि डिझेल इंजिन व्हर्जन्सही सादर करेल, ज्यामध्ये 1.5L पेट्रोल, 1.5L टर्बो पेट्रोल (170hp) आणि 2.0L डिझेल (170hp, 350Nm) इंजिन्स असतील.
2 लाखाचं डाउन पेमेंट आणि Toyota Taisor ची चावी हातात मिळाल्याशिवाय राहणार नाही, किती असेल EMI?
नवीन Sierra चे डिझाइन Retro आणि Modern यांचे उत्कृष्ट कॉम्बिनेशन असणार आहे. यात बोकसी सिल्हूट, मोठे ग्लास एरिया, LED Headlamps, Roof Rails यांसारखी डिझाइन एलिमेंट्स असतील. केबिनमध्ये Three-Screen Setup, Level-2 ADAS, Ventilated Seats, Panoramic Sunroof आणि Harman Sound System सारखे प्रीमियम फीचर्स दिली जातील. एक्स-शोरूम किंमत अंदाजे 20-25 लाख दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
Creta ची सर्वात मोठी राईवल Kia Seltos आता 2026 मध्ये Next-Generation Version सोबत येणार आहे. त्याचा ग्लोबल डेब्यू January 2026 मध्ये होईल, तर भारतात फेब्रुवारी मार्च दरम्यान ही कार लाँच होणे अपेक्षित आहे. नवीन Seltos मध्ये Opposites United डिझाइन फिलॉसफी दिसेल, ज्यामध्ये Slim LED DRLs, मोठा Front Grill आणि Connected Taillights असतील. इंटिरिअरमध्ये Dual 10.25-inch Screen, Wireless Charging, Level-2 ADAS आणि नवीन डिझाइनचा Dashboard असे फीचर्स असतील.
कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटची पायनियर Renault Duster 2026 मध्ये नवीन रूपात परत येत आहे. या कारचे लाँचिंग March 2026 पर्यंत अपेक्षित असून, प्रॉडक्शन September 2025 पासून चेन्नई प्लांटमध्ये सुरू होईल. नवीन Duster चे डिझाइन पूर्वीपेक्षा अधिक Rugged आणि दमदार असेल. यात Boxy Stance, नवीन Grill आणि V-Shaped Taillights दिलेले आहेत.
सेफ्टीसाठी या SUV मध्ये 6 Airbags, 360-Degree Camera, ESC आणि ADAS स्टँडर्ड दिले जातील. इंजिन ऑप्शन्समध्ये 1.0L Turbo Petrol (120hp), 1.2L Turbo Petrol (140hp), 1.6L Hybrid (170hp) आणि CNG व्हेरिएंट असतील. ट्रान्समिशन ऑप्शन्समध्ये 6-Speed Manual आणि CVT दिले जाईल, मात्र डिझेल इंजिनची ऑफर नसणार. नवीन Duster ची किंमत अंदाजे 10-18 लाख दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे.