फोटो सौजन्य - Social Media
रेल्वे रिक्रुटमेंट सेलने भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून विविध विभागांमध्ये अप्रेंटीस पदासाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. एकंदरीत, या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भारतीय रेल्वेमध्ये करिअर घडवू इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना प्रथम पाऊल टाकण्यासाठी जागा तयार करण्यात आली आहे. उमेदवारांना विविध विभागांमध्ये अप्रेंटीसशिप देण्यात येणार आहे. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांना त्याचा आढावा घेता येणार आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात सखोल माहितीसाठी अधिसूचनेवर लक्ष द्यावे.
हे देखील वाचा : सगळ्यात जास्त कमाई करून देणारे ५ डिग्री; वेतन मिळेल अपेक्षेच्या बाहेर
२० सप्टेंबर २०२४ रोजी RRC कडून अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या अधिसूचनेमध्ये भारतीय पश्चिम रेल्वेमध्ये लवकरच भरती प्रकिया आयोजित करण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली होती. महत्वाची बाब म्हणजे २४ सप्टेंबर २०२४ पासून अर्ज करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज नोंदवण्यास सुरु केले आहे. महत्वाचे म्हणजे उमेदवारांना २२ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. दिलेल्या मुदतीमध्ये उमेदवारांनी अर्ज नोंदवण्याचे निर्देश भारतीय रेल्वेने दिले आहे.
या भरतीच्या निवडप्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारच्या मुलाखतीची तसेच लिखित परीक्षेचा समावेश नाही आहे. एकंदरीत, या भरतीमध्ये नियुक्त होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही परीक्षेत किंवा मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची गरज नाही. उमेदवारांना फिटर, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, टर्नर, इलेक्ट्रीशियन तसेच अन्य काही विभांगांमध्ये अप्रेंटीस म्हणून काम करता येणार आहे. जर तुम्ही या विभागामध्ये अनुभवी असाल तर नक्कीच हि भरती प्रक्रिया तुमच्यासाठी आहे. रोजगाराच्या शोधामध्ये असणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विभागाचे कौशल्य असल्यास एकदा नक्की विचार करावे.
हे देखील वाचा : भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयामध्ये भरतीला सुरुवात; विविध पदांसाठी होणार उमेदवारांची नियुक्ती
या भरतीसाठी पात्र उमेदवार दहावी तसेच बारावीमध्ये ५०%हून जास्त गुणांनी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रामध्ये ITI चे प्रमाणपत्र असावे. अधिसूचनेमध्ये वयोमर्यादा नमूद करण्यात आली आहे. या वयोमर्यादेच्या आधारे उमेदवारांना अर्ज करावे लागणार आहे. एकंदरीत, १५ वर्षे ते २४ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एकूण ५,०६६ रिक्त पदे या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे.
अर्ज करताना उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. SC/ ST तसेच PWD आणि महिला उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क रक्कम आकारण्यात येणार नाही. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिसूचनेचा आढावा घ्यावा आणि वेळीच निर्णय घ्यावा.