आजच्या काळामध्ये व्यक्तीकडे कौशल्य असणे फार महत्वाचे आहे. आपल्या कौशल्यांचा जोरावर बहुतेक जण अफाट पैसे कमवत आहेत. कौशल्यांबरोबर व्यक्तीकडे शिक्षण असणेही फार महत्वाचे असते. आपले कौशल्य आणि आवड ओळखून आपण आपले शिक्षण निवडले पाहिजे. 'या' ५ डिग्री आताच्या काळामध्ये सगळ्यात जास्त वेतन देणाऱ्या डिग्रीपैकी एक आहेत. लाखोंच्या घरामध्ये वेतन मिळवून देणाऱ्या या डिग्रीचा दावा पेस्केलने केला आहे.
पेस्केलच्या रिपोर्टनुसार 'या' डिग्रीज जास्त वेतन मिळवून देतात. ( फोटो सौजन्य - Social Media )
इंस्ट्रूमेंटेशन टेक्नोलॉजीचे शिक्षण घेऊन उमेदवार सुरुवातीच्या काळात $55,300 वेतन मिळवू शकतो, तर मिड करिअरमध्ये उमेदवाराला $116,300 इतके वेतन मिळेल.
सॉफ्टवेयर इंजीनियरिंगचे शिक्षण घेऊन सुरुवातीला उमेदवार $67,200 कमवू शकतो, आणि मिड करिअरमध्ये हे वेतन $112,400 पर्यंत पोहोचते.
रेडिएशन थेरेपीचे शिक्षण घेतल्यास उमेदवार सुरुवातीला $75,200 वेतन मिळवू शकतो, तर मिड करिअरमध्ये $109,500 मिळू शकते.
फायर टेक्नोलॉजीच्या शिक्षणाने सुरुवातीच्या काळात $50,600 वेतन मिळते, आणि मिड करिअरमध्ये $102,500 इतके वेतन मिळू शकते.
इंस्ट्रूमेंटेशन आणि कंट्रोल इंजीनियरिंगचे शिक्षण घेतल्यास उमेदवार सुरुवातीला $63,300 वेतन मिळवू शकतो, तर मिड करिअरमध्ये $101,900 मिळेल.