Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST महामंडळात मेगाभरती! १७ पदांसाठी करता येणार अर्ज, लवकर करा अर्ज

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (SRTC/ST) 2026 साली १७,७४२ पदांची मोठी मेगाभरती होणार आहे. ही भरती राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी रोजगार संधी ठरणार आहे आणि एसटी सेवेला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 12, 2026 | 04:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (SRTC/ST) 2026 साली मोठी मेगाभरती होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत सांगितले की, महामंडळात १७ हजार ७४२ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी ठरणार आहे आणि त्यामुळे राज्यातील एसटी सेवेला आवश्यक मनुष्यबळ मिळेल.

सीईटी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सुधारित नियमावली जाहीर; कॉपी केल्यास…

एसटी महामंडळ अधिक सक्षम व आधुनिक करण्यासाठी दरवर्षी ५,००० नवीन बस खरेदी करण्याचे धोरण राबवले जात आहे. या नव्या बस सेवेसाठी आवश्यक असलेले कर्मचारी उपलब्ध व्हावेत यासाठी नवीन कर्मचाऱ्यांची भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. महामंडळाच्या बस ताफेत सध्या लक्षणीय वाढ झाली असून, संपाच्या काळात केवळ १२,५०० बसेस असताना आता १४,००० हून अधिक बसेस उपलब्ध आहेत. दरवर्षी ५,००० नवीन बसेस घेण्याचे उद्दिष्ट असल्यामुळे चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची गरज भासत आहे.

भरती प्रक्रियेत २०२२ च्या ऐतिहासिक संपादरम्यान सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याकडे सरकारचा कल आहे. या भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला असून, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. या मेगाभरतीत चालक, वाहक, तांत्रिक कर्मचारी तसेच अन्य सहाय्यक पदांसाठी उमेदवारांची निवड युद्धपातळीवर पार पडण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. यामुळे राज्यातील एसटी सेवा अधिक दर्जेदार, सुरक्षित, सुलभ आणि सर्वसमावेशक होईल.

Jobs In Mumbai/Thane: मुंबईकरांनो! तयारीला लागा, नोकरीची संधी! MBPA ची बंपर भरती

सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्याची संधी तसेच सार्वजनिक परिवहन सेवेत सुधारणा करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. या मेगाभरतीमुळे एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या बळकटी मिळेल आणि सेवांचा विस्तार प्रभावीपणे साधता येईल.

Web Title: Recruitment in maharashtra state road transport corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • st

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.