फोटो सौजन्य - Social Media
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML)ने भरती प्रक्रियेस सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून देशात पुन्हा एकदा रोजगार निर्मिती पाहायला मिळत आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून रोजगाराच्या शोधात असणाऱ्या अनेक लोकांना रोजगाराची सुवर्णसंधी मिळणार आहे. ITI क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या उमेदवारांना या क्षेत्रात आपली सुरुवात करता येणार आहे. नवतरुणांना ITI क्षेत्रात ट्रेनी म्हणजेच प्रशिक्षणार्थी म्हणून काम करता येणार आहे. एकनादारीत, ITI क्षेत्रातील कामाचे अनुभव घेऊन त्यांना शिकता येणार आहे. त्याचबरोबर ऑफिस असिस्टंट पदी काम करू पाहणारे उमेदवारही या भरती प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात.
हे देखील वाचा : इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती प्रक्रियेला सुरुवात; पदवीधरांना करता येईल अर्ज
विशेष म्हणजे भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) द्वारा आयोजित असणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण १०० पदांचा विचार केला जात आहे. या पदांसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही या कामात इच्छुक असाल तर आजच आपला अर्ज नोंदवून घ्या. अन्यथा वेळ निघून जाईल. या भरती प्रक्रीये६त सहभागी होण्यासाठी उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. २५ ऑगस्ट, २०२४ ते ४ सप्टेंबर, २०२४ पर्यंत अर्ज करणे अनिवार्य आहे. तारीख निघून गेल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे वले भागीदार तसेच लवकरात लवकर इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी अर्ज नोंदवावा असे BEML चे म्हणणे आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन स्वरूपात असणार आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांनी BEML च्या www.bemlindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. या संकेतस्थळावर भरती प्रेतक्रियेविषयी सगळी माहिती असून येथेच उमेदवारांना त्यांचा अर्ज नोंदवता येणार आहे. या भरती प्रक्रियेत सहभाग घेण्याअगोदर यूएमडवरांनी काही अटी शर्तींचा आढावा घ्यावा. कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असणारा उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे. त्याचबरोबर संबंधित क्षेत्रात ITI चे प्रमाणपत्र असणारे उमेदवारही अर्ज करू शकतात. वयोमर्यादेत १८ वर्षे ते ३६ वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. निवड झालेल्या उमेदवाराला दरमाह १५,५०० ते ६०,६५० इतके वेतन मिळण्याची शक्यता आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज: