फोटो सौजन्य - Social Media
भारतीय सुप्रीम कोर्टाने भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ज्युनिअर कोर्ट अटेंडंटच्या पदासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये ८० रिक्त जागांचा विचार केला जाणार आहे. भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून या संदर्भात सुप्रीम कोर्टाने अधिसूचनाही जाहीर केली आहे. यामध्ये ज्युनिअर कोर्ट अटेंडंटच्या ८० जाग रिक्त आहेत सांगितले गेले असून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरत लवकर या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवावा असे निर्देश भारतीय सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. भारतीय सुप्रीम कोर्टाने आयोजित केलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यास उमेदवारांनी सुरुवात केली आहे. जर तुम्हीही या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेऊ इच्छित आहात तर सप्टेंबरच्या १२ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुभा असल्याने या तारखेअगोदर अर्ज करणे अनिवार्य आहे. अन्यथा अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
हे देखील वाचा : सरकारी नोकरीची मोठी संधी, NCLT मध्ये ‘या’ पदांसाठी भरती; मिळणार 2,15,900 रुपये पगार
भारतीय सुप्रीम कोर्टाच्या या भरती प्रकियेसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी काही अटी शर्तींना पात्र असणे आवश्यक आहे. या अटी शर्ती SCI ने जाहीर केले असून यामध्ये शिक्षण आणि वयोमर्यादेसंबंधित गोष्टी नमूद आहेत. कोणत्याही मान्यता प्राप्त असलेल्या बोर्डातून उमेदवाराने किमान १०वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराकडे पाककला संबंधित डिप्लोमा प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे कोणत्याही रेस्टोरंट किंवा हॉटेलमध्ये शेफ म्हणून तीन वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. एकंदरीत, भारतीय सुप्रीम कोर्टाला या भरती प्रक्रियेमध्ये कुकिंगमध्ये अनुभव असणाऱ्या उमेदवाराची गरज आहे. या भरती प्रक्रियेमध्ये १८ वर्षांपासून ते २७ वर्षांपर्यंतचे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज करताना उमेदवारांना काही रक्कमेचे अर्ज शुल्क म्हणून भुगतान करावे लागणार आहे. जनरल प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ४०० रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागणार आहे. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना यामध्ये काही सूट दिली गेली आहे. SC /ST तसेच अपंगत्व असलेल्या उमेदवारांना २०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. उमेदवारांना अर्ज शुल्क ऑनलाईन स्वरूपात भरता येणार आहे.
हे देखील वाचा : आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन ! युवकांना परदेशात रोजगार संधी प्राप्त होणार
अशा प्रकारे करता येईल अर्ज: