Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा सर्वसाधारण जागांवर प्रवेश नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत म्हटले की, जर एखाद्या उमेदवाराने निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आरक्षण सवलतींचा लाभ घेतला असेल, तर तो अनारक्षित श्रेणीसाठी राखीव जागांसाठी पात्र ठरू शकत नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 07, 2026 | 01:32 PM
Collegium vs NJAC Dispute 2026, Supreme Court Judge Appointment News,

Collegium vs NJAC Dispute 2026, Supreme Court Judge Appointment News,

Follow Us
Follow Us:
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या पात्रतेबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. राखीव जागेसाठी अर्ज केल्यानंतर आणि त्याचे फायदे घेतले जातात. मात्र, नंतर उमेदवार सामान्य श्रेणीच्या जागेवर दावा करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. जरी त्यांचे गुण सामान्य श्रेणीच्या विद्यार्थ्याच्या गुणांइतके असले तरी, त्यांचा दावा राखीव जागेवरच राहील, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
देशातील मागासवर्गीय आणि अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षण धोरणाबाबत आणि स्पर्धा परीक्षांमध्ये देण्यात येणाऱ्या सवलतींबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. त्यात प्राथमिक परीक्षेत (प्रीलिम्स) आरक्षण धोरणांतर्गत सवलती मिळवणाऱ्या राखीव श्रेणीच्या उमेदवाराला त्याच आरक्षण धोरणाखाली राहावे लागेल. अंतिम परीक्षेच्या निकालांमध्ये चांगल्या रँकच्या आधारे उमेदवार अनारक्षित (सामान्य) जागेवर दावा करू शकत नाही.
दरम्यान, न्यायाधीश जे. के. माहेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारची याचिका स्वीकारत कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या उमेदवाराला अनारक्षित श्रेणीत नियुक्ती देण्याची परवानगी दिली होती. कारण त्याने अंतिम परीक्षेच्या निकालांमध्ये सामान्य श्रेणीच्या उमेदवारापेक्षा चांगला रँक मिळवला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
खटल्यानुसार, राखीव श्रेणीतील उमेदवार जी. किरण यांना अंतिम गुणवत्ता यादीत १९ वे स्थान मिळाले आणि अँटनी यांना ३७ वे स्थान मिळाले होते. मात्र, केडर वाटपाच्या वेळी कर्नाटकात फक्त एक सामान्य श्रेणीची रिक्त जागा होती आणि अनुसूचित जातीच्या अंतर्गत व्यक्तीची रिक्त जागा नव्हती. त्यांच्या वरिष्ठ श्रेणीमुळे, किरण यांनी सामान्य श्रेणीची पदे मिळवण्याचा दावा केला.
न्यायालयाने फेटाळला युक्तिवाद
सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत म्हटले की, जर एखाद्या उमेदवाराने निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आरक्षण सवलतींचा लाभ घेतला असेल, तर तो अनारक्षित श्रेणीसाठी राखीव जागांसाठी पात्र ठरू शकत नाही. अर्जदाराने प्राथमिक परीक्षेत आरक्षणाचा लाभ घेतल्यामुळे अनुसूचित जातीच्या उमेदवाराला भारतीय वन सेवेच्या (IFS) अनारक्षित संवर्गात नियुक्त करण्याच्या विनंतीवर विचार करण्यास खंडपीठाने नकार दिला.
हेदेखील वाचा : दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत आज होणार निर्णय; माणसांसाठी एवढ्या याचिका येत नाही, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

Web Title: After availing the benefits of reservation there is no re entry into general category seats supreme court decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • Court Decision
  • Reservation Issue
  • Supreme Court

संबंधित बातम्या

शिवसेना शिंदेंचीच? सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा जोरदार युक्तिवाद, ‘आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजे राजकीय फूट’
1

शिवसेना शिंदेंचीच? सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा जोरदार युक्तिवाद, ‘आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजे राजकीय फूट’

Gokul Election : गोकुळच्या 492 संस्थांचं मतदान धोक्यात? सर्वोच्च न्यायालयात धाव; निवडणुकीआधी मोठी खळबळ
2

Gokul Election : गोकुळच्या 492 संस्थांचं मतदान धोक्यात? सर्वोच्च न्यायालयात धाव; निवडणुकीआधी मोठी खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.