सरकारी नोकरीची मोठी संधी, NCLT मध्ये या पदांसाठी भरती, मिळणार 2,15,900 रुपये पगार
राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहनिबंधक, उपनिबंधक, सहायक निबंधक पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणारआहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (12 ऑक्टोबर 2024) असणार आहे.
संस्थेचे नाव – राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण
भरले जाणारे पद –
1. सहनिबंधक
2. उपनिबंधक
3. सहायक निबंधक
एकूण रिक्त पद संख्या – 15 पदे
वयोमर्यादा – 56 वर्ष
नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली
हेही वाचा – ठाणे महापालिकेत विविध पदांवर भरती सुरु; वाचा… काय आहे आवश्यक पात्रतेच्या अटी…
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 60 दिवस (12 ऑक्टोबर 2024)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, NCLT राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, 6 वा मजला, ब्लॉक क्रमांक 3, C.G.O. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110 003.
भरतीचा तपशील
सहनिबंधक – 02 पदे
उपनिबंधक – 10 पदे
सहायक निबंधक – 03 पदे
किती मिळणार पगार
सहनिबंधक Level-13 (123100 ते 215900 प्रति महिना)
उपनिबंधक Level-12 (78800 ते 209200 प्रति महिना)
सहायक निबंधक Level-11 (67700 ते 208700 प्रति महिना)
कसा कराल अर्ज
राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण अंतर्गत सहनिबंधक, उपनिबंधक, सहायक निबंधक पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडायची आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करताना संपूर्ण माहिती भरावी, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (10 ऑक्टोबर 2024) असणार आहे. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. असे राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, 1 जून, 2016 पासून राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या आदेशांविरुद्ध अपीलांच्या सुनावणीसाठी कंपनी कायदा, 2013 च्या कलम 410 अंतर्गत राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी वाचा जाहिरात पहा – https://nclt.gov.in/sites/default/files/Career/Scan20240812151038.pdf
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://nclt.gov.in/ ला भेट द्या.