
education
Railway Apprentice Recruitment 2026: रेल्वेत काम करण्याचे आणि तांत्रिक क्षेत्रात अनुभव मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), जयपूरने उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये (NWR) अप्रेंटिसच्या २,००८ जागांसाठी भरती काढली आहे. या भरतीसाठी १० वी पास आणि आयटीआय (ITI) प्रमाणपत्र असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे, निवडीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यांची निवड १० वी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या मेरीट लिस्टवरून केली जाईल.
या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची निवड प्रक्रिया. साधारणपणे सरकारी भरतीमध्ये उमेदवारांना लेखी परीक्षा आणि इतर टप्प्यांमधून जावे लागते, परंतु उत्तर पश्चिम रेल्वेच्या या अप्रेंटिस भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड १० वी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीची सरासरी काढून तयार केलेल्या मेरीट लिस्टच्या आधारे होईल. ही मेरीट ट्रेड आणि रेल्वे डिव्हिजननुसार तयार केली जाईल. मेरीटमध्ये स्थान मिळवणाऱ्या उमेदवारांना पुढील कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी प्रक्रियेतून जावे लागेल. या टप्प्यांमध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.
यामध्ये अजमेर, बीकानेर, जयपूर आणि जोधपूर सारख्या रेल्वे मंडळात उमेदवारांना ट्रेनिंगची संधी मिळेल. या भरतीत फिटर, वेल्डर आणि इलेक्ट्रीशियन यांसारख्या तांत्रिक ट्रेडचा समावेश आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशनमध्ये आपल्या ट्रेड आणि संबंधित मंडळातील उपलब्ध पदांची माहिती आवश्य तपासून घ्यावी.
रेल्वेच्या या भरतीत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी (मॅट्रिक) किंवा १०+२ शिक्षण प्रणाली अंतर्गत समकक्षा परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच १० वी मध्ये किमान ५० टक्के गुण असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) प्रमाणपत्र असणे देखील अनिवार्य आहे. हे प्रमाणपत्र NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त संस्थेचे असावे; म्हणजेच केवळ १० वी पास असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार नाहीत, त्यांच्याकडे संबंधित ट्रेडची आयटीआय पात्रता असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादेचा विचार केला तर, उमेदवाराचे किमान वय १५ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे असावे. वयाची गणना २२ नोव्हेंबर २०२६ च्या आधारे केली जाईल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सूट दिली जाईल, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षांची सूट मिळेल.
एम्सने जाहीर केला INI CET चा निकाल; ३४ हजारांहून अधिक उमेदवार यशस्वी, असा करा चेक
रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया २३ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार २२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत अधिकृत संकेतस्थळ rrcjaipur.in वर अर्ज करू शकतात.
Ans: यामध्ये अजमेर, बीकानेर, जयपूर आणि जोधपूर सारख्या रेल्वे मंडळात उमेदवारांना ट्रेनिंगची संधी मिळेल. या भरतीत फिटर, वेल्डर आणि इलेक्ट्रीशियन यांसारख्या तांत्रिक ट्रेडचा समावेश आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशनमध्ये आपल्या ट्रेड आणि संबंधित मंडळातील उपलब्ध पदांची माहिती आवश्य तपासून घ्यावी.
Ans: या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड १० वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे तयार केलेल्या मेरीट लिस्टवरून केली जाईल.
Ans: या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) आहे.