Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरटीई नोंदणीची स्थिती! ७९० शाळा देणार मोफत प्रवेश; आरटीई नोंदणीची उत्तम स्थिती, ८६११ जागा

राज्यात आरटीई अंतर्गत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात शाळा नोंदणी पूर्ण झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 09, 2026 | 06:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या आरटीई (Right to Education) अंतर्गत २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात शाळांची नोंदणी पूर्ण करण्यात आली असून, अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील एकूण ७९० खासगी शाळांनी आरटीई अंतर्गत नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये ८ हजार ६११ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास कुणाला किती माहिती? ‘श्री शिव छत्रपती ज्ञानस्पर्धा’चे आयोजन

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे शाळा नोंदणी व पडताळणीची प्रक्रिया ९ जानेवारीपासून सुरू करण्यात आली होती. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता शासनाच्या सूचनांनुसार विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाचे उद्दिष्ट शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आहे.

आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक २२६ शाळांमध्ये २,५४२ जागा उपलब्ध आहेत. अकोला जिल्ह्यात १८३ शाळांत १,९७७ जागा, यवतमाळ जिल्ह्यात २०० शाळांत २,१७२ जागा, वाशीम जिल्ह्यात ९५ शाळांत १,००७ जागा, तर बुलडाणा जिल्ह्यात ८६ शाळांत ९१३ जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच अमरावती विभागात आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाल्या आहेत.

गेल्या शैक्षणिक वर्षात अमरावती विभागात आरटीई अंतर्गत सुमारे ७ हजार जागांवर प्रवेश झाले होते. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये प्रवेश प्रक्रियेनंतरही शेकडो जागा रिक्त राहिल्या होत्या. तरीही बहुतांश प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना व पालकांना मोठा दिलासा मिळाला होता. याच धर्तीवर यंदाही वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, “आरटीई अंतर्गत शाळा नोंदणी आणि पडताळणीचा टप्पा पूर्ण झाला असून, आता विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाकडून अंतिम सूचना मिळण्याची प्रतीक्षा आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.”

CBSE च्या विद्यार्थ्यांनो! दहावीची परीक्षा आता दोन वेळा; २०२६ पासून नवा नियम लागू

आरटीई प्रवेश प्रक्रियेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित व अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची संधी मिळते. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष आता विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया नेमकी कधी सुरू होते, याकडे लागले असून, यंदा अमरावती विभागात आरटीई प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Rte registration status 790 schools will provide free admissions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • Career News
  • Marathi School
  • RTI

संबंधित बातम्या

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
1

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
2

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
3

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
4

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.