
education
आजकालच्या तरुणांमध्ये ‘YOLO’ (You Only Live Once) म्हणजेच आयुष्य एकदाच जगले जाते, ही मानसिकता खूप प्रबळ झाली आहे. यामुळे भविष्याची बचत करण्यापेक्षा वर्तमानकाळात आनंद घेण्याकडे तरुणांचा कल अधिक असतो.
ब्रँड क्लोथिंग, वीकेंड पार्टीज, महागडे गॅजेट्स आणि सहज उपलब्ध होणाऱ्या इन्स्टंट लोन किंवा ‘Buy Now Pay Later’ पर्यायांमुळे तरुणांचे बजेट कोलमडते. बऱ्याचदा पगारातील मोठा हिस्सा हा महिना सुरू होण्याच्या पहिल्या १० दिवसांतच ईएमआय, क्रेडिट कार्डचे बिल आणि अनावश्यक खर्चानुसार संपून जातो, ज्यामुळे उर्वरित महिना आर्थिक तणावात काढावा लागतो.
या आर्थिक समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आणि योग्य पद्धतीने बचत करण्यासाठी काही प्रभावी मार्ग अवलंबणे गरजेचे आहे. सर्वात पहिले म्हणजे, ’50-30-20 चा नियम’ फॉलो करा, ज्यानुसार तुमच्या पगारातील ५० टक्के भाग गरजेच्या गोष्टींवर (घरभाडे, बिल, अन्न), ३० टक्के आवडीनिवडी किंवा इच्छांवर (फिगरिंग, बाहेर खाणे) आणि उरलेले २० टक्के पैसे थेट सेव्हिंग किंवा गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवले पाहिजेत. तसेच, महिना सुरू होण्यापूर्वीच खर्चाचे एक निश्चित बजेट आखा आणि प्रत्येक लहान-मोठ्या खर्चाची नोंद ठेवा, जेणेकरून कुठे अनावश्यक पैसा वाया जात आहे हे लक्षात येईल. क्रेडिट कार्डचा वापर काळजीपूर्वक करून आणि भविष्यासाठी एसआयपी (SIP) किंवा म्युच्युअल फंडात छोटी गुंतवणूक सुरू करून तरुण वर्ग सहजपणे आर्थिक शिस्त लावू शकतो.