फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Maharashtra SSC HSC & CBSE Exam Timetable 2027: आगामी शिक्षण सत्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्य मंडळाची बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
| दिनांक | विषय |
|---|---|
| ८ फेब्रुवारी २०२७ | इंग्रजी |
| ९ फेब्रुवारी २०२७ | हिंदी |
| १० फेब्रुवारी २०२७ | मराठीसह विविध भाषांचे पेपर |
| १२ फेब्रुवारी २०२७ | भौतिकशास्त्र |
| १६ फेब्रुवारी २०२७ | रसायनशास्त्र |
| १७ फेब्रुवारी २०२७ | अर्थशास्त्र |
| २० फेब्रुवारी २०२७ | गणित आणि संख्याशास्त्र |
| २३ फेब्रुवारी २०२७ | जीवशास्त्र |
| दिनांक | विषय |
|---|---|
| १५ फेब्रुवारी २०२७ | प्रथम भाषा |
| २२ फेब्रुवारी २०२७ | इंग्रजी |
| २४ फेब्रुवारी २०२७ | हिंदी |
| २ मार्च २०२७ | गणित भाग १ |
| ४ मार्च २०२७ | गणित भाग २ |
| ८ मार्च २०२७ | विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ |
| ११ मार्च २०२७ | विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २ |
| १३ मार्च २०२७ | इतिहास व राज्यशास्त्र |
| १५ मार्च २०२७ | भूगोल |
विद्यार्थ्यांनी सविस्तर आणि खात्रीशीर वेळापत्रकासाठी मंडळाच्या अधिकृत [https://www.mahasscboard.in/](https://www.mahasscboard.in/) या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन बोर्डाचे सचिव दीपक माळी यांनी केले आहे. तसेच अन्य माध्यमांवरील फेकाफेकीच्या किंवा संभ्रम निर्माण करणाऱ्या वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राज्य मंडळासोबतच सीबीएसईनेही २०२७ च्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत:
सीबीएसई दहावी: परीक्षांची सुरुवात १६ फेब्रुवारी रोजी चित्रकलेच्या पेपरने होईल. १७ फेब्रुवारीला गणित, १९ फेब्रुवारीला गृहविज्ञान, २२ फेब्रुवारीला विज्ञान, २६ फेब्रुवारीला इंग्रजी आणि ८ मार्चला सामाजिक शास्त्राचा पेपर होणार आहे.
AIIMS Nagpur Recruitment 2026: एम्स नागपूरमध्ये संशोधन वैज्ञानिक पदावर मेगा भरती; किती मिळणार मानधन?
सीबीएसई बारावी: १६ फेब्रुवारीला भौतिकशास्त्राच्या पेपरने बारावीच्या परीक्षा सुरू होतील. १७ फेब्रुवारीला भूगोल, १९ फेब्रुवारीला जैवतंत्रज्ञान, २७ फेब्रुवारीला रसायनशास्त्र, ९ मार्चला गणित, २५ मार्चला जीवशास्त्र आणि २७ मार्चला इतिहासाचा पेपर पार पडेल.
Ans: महाराष्ट्र राज्य मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारी २०२७ पासून, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार आहे.
Ans: बारावीच्या परीक्षेची सुरुवात ८ फेब्रुवारी २०२७ रोजी इंग्रजीच्या पेपरने होईल.
Ans: इयत्ता दहावीच्या गणिताच्या पेपरपैकी गणित भाग १ चा पेपर २ मार्च २०२७ रोजी आणि गणित भाग २ चा पेपर ४ मार्च २०२७ रोजी होणार आहे.






