Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्नाटकात सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस सुरू; विद्यार्थिनींना मिळणार तंत्रज्ञान कौशल्यांचे प्रशिक्षण

सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट इंडिया, बेंगळुरूने म्हैसूरमधील जीएसएसएस इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी फॉर विमेन येथे सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस सुरू केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 20, 2025 | 03:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट इंडिया, बेंगळुरू (एसआरआय-बी)ने कर्नाटकमधील पहिल्या ऑल-विमेन्स इंजिनिअरिंग कॉलेज गीता शिशू शिक्षण संघ (जीएसएसएस) इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी फॉर विमेन, म्हैसूर येथे सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस (एसआयसी) उपक्रमाचे उद्घाटन केले. हा उपक्रम तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांची प्रगती वाढवण्यासाठी असून, एसटीईएममधील (STEM) लैंगिक समानतेला चालना देण्याच्या सॅमसंगच्या प्रयत्नांचा भाग आहे. यात विद्यार्थिनींना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशिन लर्निंग (ML), बिग डेटा, कोडिंग आणि प्रोग्रामिंगसारख्या तंत्रज्ञान कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. सप्टेंबर २०२२ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमामध्ये सॅमसंगच्या जागतिक आरअँडडी तज्ज्ञांनी विशेष डिझाइन केलेला अभ्यासक्रम आहे. यामध्ये विद्यार्थिनींना ऑफलाइन आणि ऑनलाइन माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना एसआरआय-बी आणि जीएसएसएस इन्स्टिट्यूटच्या मेंटर्सकडून मार्गदर्शन मिळेल आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल.

फक्त दहावी शिकलात? तरीही मिळेल High paying Salary, संधी गमावू नका!

सॅमसंगच्या कॉर्पोरेट उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मोहन राव गोली म्हणाले, “सॅमसंगमध्‍ये आमचा विश्‍वास आहे की, संधी सर्वसमावेशक असल्‍यास इनोव्‍हेशन प्रगत होऊ शकते. कर्नाटकमधील पहिल्‍या विमेन्‍स इंजीनिअरिंग कॉलेजमध्‍ये सॅमसंग इनोव्हेशन कॅम्‍पस (एसआयसी)चे उद्घाटन करताना आम्‍हाला अत्‍यंत अभिमान वाटत आहे, जेथे तरूण विचारवंत एक्‍स्प्‍लोअर, प्रयोग करतील आणि तंत्रज्ञानाच्‍या मर्यादांना दूर करतील. सरकारच्‍या #DigitalIndia व #MakeinIndia मोहिमांशी संलग्‍न राहत हा कॅम्‍पस विद्यार्थ्‍यांना देशामधून तंत्रज्ञान प्रगतीला गती देण्‍यास सक्षम करतो. आम्‍ही महिला प्रमुखांना निपुण करण्‍यास उत्‍सुक आहोत, जेथे तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून निर्मिती, नाविन्‍यता आणि जगामध्‍ये परिवर्तन घडवून आणतील.”

२०२४ मध्ये सॅमसंग साऊथवेस्ट एशियाने एसआयसी उपक्रमाद्वारे ३,५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले, जे २०२३ मधील ३,००० विद्यार्थ्यांपेक्षा अधिक आहे. सॅमसंगचा आणखी एक उपक्रम सॉल्व्ह फॉर टुमॉरो (SFT) यांसारख्या उपक्रमांतून भारतातील तरुणांना जागतिक टेक लीडर्स बनवण्याचे उद्दिष्ट आहे. जीएसएसएस (आर), म्हैसूरच्या सचिव अनुपमा बी. पंडित म्हणाल्या, “या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना उद्योग-समर्पित शिक्षण आणि प्रत्यक्ष तांत्रिक अनुभव मिळेल. डिजिटल कौशल्यांमधील तफावत दूर करून हा उपक्रम महिलांना भविष्यासाठी तयार करेल.”

UPSC CSM Recruitment: कसे करावे अर्ज? जाणून घ्या ‘या’ संपूर्ण अर्ज प्रक्रियेविषयी

सॅमसंगने कर्नाटकमधील सात इतर संस्थांमध्येही एसआयसी सुरू केले आहेत, त्यामध्ये बीएनएम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, केम्ब्रिज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, केएलई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आरएनएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे. तसेच, आयआयआयटी-कुर्नूल येथेही एक केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रांमधून ८०० हून अधिक विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. सॅमसंगचा हा उपक्रम भारतातील तरुणांना तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक सक्षम करून देशाला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Web Title: Samsung innovation campus opens in karnataka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • education news
  • Karnataka

संबंधित बातम्या

शिक्षणाचा आगळा-वेगळा उमटविला ठसा, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरेंची किमया
1

शिक्षणाचा आगळा-वेगळा उमटविला ठसा, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरेंची किमया

शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश! आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक ज्ञान येणार शिकता
2

शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश! आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक ज्ञान येणार शिकता

शिक्षक एक अन् विद्यार्थी 60; अमरावतीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा
3

शिक्षक एक अन् विद्यार्थी 60; अमरावतीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा

सावत्र आई पक्की वैरीण…! 6 वर्षाच्या चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावरून क्रुरतेने ढकलतानाचे CCTV फुटेज समोर
4

सावत्र आई पक्की वैरीण…! 6 वर्षाच्या चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावरून क्रुरतेने ढकलतानाचे CCTV फुटेज समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.