
Man Stops KSRTC Bus, Shouts 'Allahu Akbar' in Karnataka ( कर्नाटकात एका व्यक्तीने KSRTC बस थांबवून 'अल्लाहु अकबर'च्या घोषणा दिल्या )
ही घटना सकाळच्या गर्दीच्या वेळी घडली, ज्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. घटनास्थळावरून निघून गेलेल्या त्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहिती नुसार ही घटना शुक्रवारी (२० नोव्हेंबर २०२६) सकाळी भर रस्त्यात घडली. कर्नाटकच्या मांड्या शहरातील महावीर सर्कल येथे हा सर्व प्रकार घडल्याचे सांगितले जाते. उमर फारुख नावाच्या एका तरुणाने आपली बर्गमन स्कूटी अचानक एका सरकारी (KSRTC) बससमोर थांबवली. त्यानंतर त्याने बससमोर उभा राहून मोठ मोठ्याने ‘अल्लाहु अकबर’ आणि ‘नारा-ए-तकबीर’ अशा घोषणा देऊ लागला. ज्यामुळे बसधील प्रवासी आणि आसपासच्या नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
#Mandya Karnataka: Umar Farooq stopped his bike in the middle of traffic, stood in front of a bus filled with passengers and shouted “Allahu Akbar” and “Nara-e-Takbir”.
Passengers and locals were left terrified. He then fled on his bike.
Arreseted by police; claims mentally unstable.
@Abhie819 — Sanjiv K Pundir (@k_pundir) November 21, 2026
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताचं कर्नाटकातील मांड्या येथील पोलिसांनी तात्काळ तपास करून उमर फारुख याला त्याच्या हलहल्ली गावातून त्याचा शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी (Public Nuisance)हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले जाते.
मांड्याच्या पोलीस अधीक्षक (SP) डॉ. शोभा रानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत उमर फारुख मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस चौकशीत त्याने “आपल्या अंगात देव (खुदा) आला होता” असा दावा केला. तसेच, त्याचे आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत कौटुंबिक वाद सुरू असून त्याने यापूर्वीही विचित्र वर्तन केले असल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांनी उमर फारुखची मानसिक स्थिती तपासण्यासाठी त्याची योग्यरित्या वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला असून, वैद्यकीय अहवाल आणि तपासाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.
Ans: ही घटना कर्नाटकातील मांड्या शहरातील महावीर सर्कल येथे घडली.
Ans: या युवकाचे नाव उमर फारुख असून तो हलहल्ली गावचा रहिवासी आहे.
Ans: शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळच्या गर्दीच्या वेळी घडली.