Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI संशोधनाला चालना देण्यासाठी सॅमसंग R&D आणि IIT बॉम्बेमध्ये सामंजस्य करार !

सॅमसंग आर अ‍ॅंड डी इन्स्टिट्यूट, नोएडा ने आयआयटी बॉम्‍बे सोबत सामंजस्‍य करार केला आहे . याअंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय), डिजिटल हेल्‍थ आणि इतर महत्त्वपूर्ण क्षेत्रांमधील ब्रेकथ्रूंचा शोध घेतला जाणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 22, 2024 | 04:56 PM
AI संशोधनाला चालना देण्यासाठी सॅमसंग R&D आणि IIT बॉम्बेमध्ये सामंजस्य करार !
Follow Us
Close
Follow Us:

सॅमसंग आर अ‍ॅंड डी इन्स्टिट्यूट, नोएडा (एसआरआय-नोएडा)ने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी बॉम्‍बे (आयआयटी बॉम्‍बे) सोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली आहे. या सामंजस्‍य करारांतर्गत, एसआरआय-नोएडा आणि आयआयटी बॉम्‍बे आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय), डिजिटल हेल्‍थ आणि इतर महत्त्वपूर्ण क्षेत्रांमधील ब्रेकथ्रूंचा शोध घेतील. हा पंचवार्षिक सहयोग संयुक्‍त संशोधन प्रकल्‍पांची सुविधा देईल, आयआयटी बॉम्‍बेचे विद्यार्थी व प्राध्‍यापकवर्गाला सॅमसंग इंजीनिअर्ससोबत सहयोग करण्‍याची संधी देईल.

या दृष्टिकोनामुळे विद्यार्थ्‍यांसाठी नवीन मार्ग खुले होतील, तसेच उद्योगासाठी त्‍यांच्‍या सुसज्‍जतेमध्‍ये वाढ होईल. याव्‍यतिरिक्‍त, हा सहयोग सॅमसंग इंजीनिअर्सना आयआयटी बॉम्‍बेमधील डिजिटल हेल्‍थ व एआय सारख्‍या उदयोन्‍मुख तंत्रज्ञानांमधील विशेषीकृत प्रशिक्षण आणि सर्टिफिकेशन प्रोग्राम्‍ससह सक्षम करेल.

एसआरआय-नोएडाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक क्‍यूनग्‍यून रू आणि आयआयटी बॉम्‍बे येथील संशोधन व विकासाचे सहाय्यक डिन प्रो. उपेंद्र व्‍ही. भंडारकर यांनी औपचारिकरित्‍या सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षऱ्या केल्‍या. आयआयटी बॉम्‍बे येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या इव्‍हेण्‍टमध्‍ये कोटिया सेंटर फॉर डिजिटल हेल्‍थ (केसीडीएच) मधील फॅकल्‍टी सदस्‍यांसह केसीडीएचचे प्रमुख प्रो. रणजित पदिन्‍हातीरी, प्रो. निर्मल पंजाबी आणि डॉ. राघवेंद्रन लक्ष्‍मीनारायणन उपस्थित होते.

अग्रणी संशोधन, नाविन्‍यता आणि गुणवत्ता विकासासाठी संधी

“हा सहयोग उद्योग कौशल्‍य व शैक्षणिक उत्‍कृष्‍टतेच्‍या प्रबळ एकत्रिकरणाला सादर करतो, तसेच अग्रणी संशोधन, नाविन्‍यता आणि गुणवत्ता विकासासाठी संधी देतो. आम्‍ही अर्थपूर्ण प्रगतीला चालना देण्‍यासाठी आणि डिजिटल हेल्‍थ, एआय व इतर उदयोन्‍मुख तंत्रज्ञानांच्‍या क्षेत्रामधील वास्‍तविक विश्‍वातील आव्‍हानांचे निराकरण करणारे सोल्‍यूशन्‍स विकसित करण्‍यासाठी आयआयटी-बीचे अपवादात्‍मक फॅकल्‍टी व विद्यार्थ्‍यांसोबत सहयोगाने काम करण्‍यास उत्‍सुक आहोत. सहयोगाने, आमचा ज्ञानाची देवाणघेवाण करणारी व इनोव्‍हेशनची इकोसिस्‍टम डिझाइन करण्‍याचा मनसुबा आहे, जिचा आमची कंपनी आणि समाजाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल,’’ असे एसआयआर-नोएडाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक क्‍यूनग्‍यून रू म्‍हणाले.

विद्यार्थी व फॅकल्‍टीसाठी नवीन मार्ग

“आजचा क्षण उत्‍साहवर्धक टप्‍पा आहे, जेथे आम्‍ही एसआरआय-नोएडासोबत औपचारिकरित्‍या आमच्‍या सहयोगाची घोषणा केली आहे. या सामंजस्‍य करारामधून नाविन्‍यता, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सर्वोत्तमतेसाठी प्रयत्‍नाप्रती आमची समान कटिबद्धता दिसून येते. सहयोगाने काम करत आम्‍ही विद्यार्थी व फॅकल्‍टीसाठी नवीन मार्ग तयार करत आहोत, ज्‍यामुळे त्‍यांना उद्योग, प्रगत संशोधन संधींशी संलग्‍न होण्‍यास आणि समुदायांच्या विकासाप्रती योगदान देण्‍यास मदत होईल,’’ असे आयआयटी बॉम्‍बे येथील सहाय्यक डिन (आरअँडडी) प्रो. उपेंद्र व्‍ही. भंडारकर म्‍हणाले.

हा सामंजस्‍य करार संयुक्‍त रिसर्च पेपर्सच्‍या प्रकाशनाला प्रेरित करतो, ज्ञानाची देवाणघेवाण करण्‍याला चालना देतो, ज्‍यामुळे तंत्रज्ञान प्रगती आणि उद्योग-संबंधित नाविन्‍यतेला गती मिळेल. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून सॅमसग आणि आयआयटी बॉम्‍बे कौशल्‍याच्‍या शाश्‍वत देवाणघेवाणीसाठी पाया स्‍थापित करत आहे, ज्‍यामुळे नेक्‍स्‍ट-जनरेशन तंत्रज्ञानांमधील मर्यादा दूर होतील आणि भावी ब्रेकथ्रूंसाठी प्रेरणा मिळणार आहे.

Web Title: Samsung rd and iit bombay sign mou to boost ai research

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2024 | 04:56 PM

Topics:  

  • IIT Bombay
  • technology

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.