Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI Apprentice Recruitment 2026 : नोकरीची मोठी संधी! SBI ने अर्जाची मुदत वाढवली; 7000 पेक्षा जास्त जागा रिक्त

SBI मध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने अप्रेंटिस भरती 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 8 जूनवरून वाढवून 15 जून 2026 केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 12, 2026 | 04:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. SBI अप्रेंटिस भरती 2026 अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांना आता 15 जून 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. यापूर्वी अर्जाची शेवटची तारीख 8 जून निश्चित करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेद्वारे देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 7,150 अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. पदवीधर उमेदवारांना बँकिंग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव मिळवण्याची आणि भविष्यातील करिअरसाठी स्वतःला सिद्ध करण्याची ही उत्तम संधी मानली जात आहे.

Teacher Training : जनगणनेमुळे रखडलेले शिक्षक प्रशिक्षण पुन्हा मार्गी; ‘या’ तारखेपर्यंत पूर्ण होणार

इच्छुक उमेदवार SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. मात्र, ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी National Apprenticeship Promotion Scheme (NAPS) पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. NAPS नोंदणी पूर्ण केल्यानंतरच उमेदवारांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल.

  • अर्ज प्रक्रिया सुरू : 19 मे 2026
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत : 15 जून 2026
  • NAPS नोंदणी पोर्टल : apprenticeshipindia.gov.in
  • SBI करिअर संकेतस्थळ : sbi.co.in/careers
या भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच 1 एप्रिल 2026 रोजी उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 एप्रिल 1998 ते 1 एप्रिल 2006 या कालावधीत झालेला असावा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणी या दोन टप्प्यांमध्ये केली जाईल. ऑनलाइन परीक्षेत सामान्य व आर्थिक जागरूकता, सामान्य इंग्रजी, तर्कशक्ती, संख्यात्मक योग्यता आणि संगणकीय योग्यता या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. लेखी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना स्थानिक भाषेतील प्राविण्य चाचणी द्यावी लागेल. मात्र, ज्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावीमध्ये संबंधित स्थानिक भाषा विषय म्हणून शिकलेली असेल, त्यांना या चाचणीतून सूट मिळणार आहे.

NEET Re-Exam UG 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! NTA ने वाढवली परीक्षांची वेळ, सुरक्षेचा होणार कडेकोट बंदोबस्त

निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या कालावधीसाठी अप्रेंटिस म्हणून प्रशिक्षण दिले जाईल. या कालावधीत त्यांना दरमहा 15 हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. मात्र, ही नियुक्ती अप्रेंटिसशिप स्वरूपातील असल्याने नियमित कर्मचाऱ्यांना मिळणारे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, भविष्यनिर्वाह निधी, पेन्शन किंवा वैद्यकीय सुविधा यांसारखे लाभ मिळणार नाहीत. बँकिंग क्षेत्रात करिअरची सुरुवात करू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी ही भरती महत्त्वाची संधी मानली जात आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा.

Web Title: Sbi apprentice recruitment 2026 vaccancies for more than 7000 seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • SBI
  • SBI Bank

संबंधित बातम्या

SBI Chairman Statement : ‘केवळ Sensex कडे पाहू नका…’ SBI अध्यक्षांचा गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला
1

SBI Chairman Statement : ‘केवळ Sensex कडे पाहू नका…’ SBI अध्यक्षांचा गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.