Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

State Bank Of India Mclr Interest Rate: देशातील सर्वात मोठ्या बँकेचा मोठा निर्णय! कर्ज महागणार, EMI वाढणार की काय?

State Bank Of India Mclr Interest Rate: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या काही MCLR दरांमध्ये ०.१५ टक्क्यांची म्हणजेच १५ बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. हे नवीन दर १५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू झाले आहेत. तीन महिने, सहा महिने, एक वर्ष आणि त्यापेक्षा जास्त कालावधीच्या MCLR दरांमध्ये वाढ करण्यात आली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 16, 2026 | 12:16 PM
State Bank Of India Mclr Interest Rate (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

State Bank Of India Mclr Interest Rate (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • SBI ने काही MCLR दरांमध्ये ०.१५% वाढ केली.
  • वाढलेले दर १५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू झाले.
  • तीन महिने, सहा महिने, एक वर्ष आणि त्यापुढील कालावधीच्या MCLR दरांत वाढ
सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जदारांना मोठा झटका दिला आहे. SBI ने आपला MCLR दर वाढवला आहे. MCLR म्हणजे बँक ज्या दराने कर्ज देते त्याचा बेस रेट. यात 0.15% ची वाढ केली आहे. 15 ऑक्टोबरपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. आता SBI कडून कर्ज घेणे आधीपेक्षा महाग होणार आहे. State Bank Of India Mclr Interest Rate:

कोणत्या कर्जावर किती वाढ?

SBI ने सगळ्याच दरात वाढ केलेली नाही. एक दिवसाचा आणि एक महिन्याचा MCLR आहे तसाच ठेवला आहे. त्यात कोणताही बदल नाही.पण जर तुमचा MCLR कालावधी 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तिथे 0.15% वाढ केली आहे. म्हणजे 15 बेसिस पॉईंट्सने व्याज वाढले आहे. हे जरी ऐकायला कमी वाटत असले तरी मोठ्या कर्जावर महिन्याला हजार रुपयांचा फरक पडू शकतो.

कोणाला बसणार फटका?

सगळ्यांनाच हा फटका बसणार नाही. ज्यांनी SBI कडून MCLR वर कर्ज घेतले आहे त्यांनाच याचा त्रास होईल. आजकाल बरीच होम लोन, कार लोन, पर्सनल लोन MCLR ला जोडलेली असतात. त्यांना फ्लोटिंग रेट लोन म्हणतात. अशा लोकांचे व्याज वाढणार.पण जर तुमचे कर्ज EBLR किंवा RLLR म्हणजे रेपो रेटला जोडलेले असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही. या वाढीचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. EBLR वर असलेल्या लोकांना दिलासा आहे.

Inflation: ऑक्टोबरमध्ये महागाई माजवणार हाहाःकार? घाऊक महागाई १२% आणि किरकोळ महागाई ६% ओलांडण्याची शक्यता

तुमचा EMI वाढणार का?

MCLR वाढल्यामुळे EMI वाढणार हे नक्की. दोन गोष्टी होऊ शकतात. एकतर तुम्हाला दर महिन्याला जास्त EMI भरावा लागेल किंवा बँक तुमच्या कर्जाचा कालावधी वाढवेल. म्हणजे आधी 20 वर्ष कर्ज होते तर आता 21 वर्ष होईल.पण लगेचच EMI वाढेल असे नाही. बऱ्याच कर्जाचा रिसेट पीरियड असतो. म्हणजे 6 महिन्यांनी किंवा वर्षाने व्याज बदलते. त्यामुळे तुमचा रिसेट डेट येईपर्यंत जुणाच दर लागू राहील. त्यानंतर नवीन वाढलेला दर लागेल. आणि महत्वाचे म्हणजे ही वाढ कायमची नाहीये, काही काळासाठी असू शकते.

RBI ने पण दर वाढवले

याच्या एक आठवडा आधी म्हणजे 7 ऑक्टोबर 2026 ला RBI ने पण आपला रेपो रेट वाढवला होता. 25 बेसिस पॉईंट्सने वाढवून 5.50% केला आहे. रेपो रेट म्हणजे RBI ज्या दराने बँकांना पैसे देते. RBI ने दर वाढवल्यामुळे बँकांना पैसे महाग मिळायला लागले. म्हणूनच SBI सारख्या मोठ्या बँका आपले दर वाढवत आहेत. पुढच्या काही दिवसात इतर बँका पण दर वाढवतील अशी शक्यता आहे.

Share Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत; कोणते शेअर्स राहणार चर्चेत?

MCLR म्हणजे खूप लोकांना MCLR म्हणजे काय हेच माहिती नसते. सोप्या भाषेत सांगायचे तर बँकेला पैसे उभे करण्यासाठी जो खर्च येतो, त्यावरून हा दर ठरवला जातो. यात बँकेचा नफा, खर्च सगळे जोडलेले असते. हा एक बेस दर आहे. तुमचे कर्ज या दराशी जोडलेले असते. त्यामुळे MCLR वाढला की तुमचे कर्ज महाग होते आणि MCLR कमी झाला की कर्ज स्वस्त होते.त्यामुळे जर तुम्ही SBI चे कर्जदार असाल आणि तुमचे कर्ज MCLR वर असेल तर एकदा बँकेत जाऊन चौकशी करा. तुमचा नवीन EMI किती होणार आहे आणि तुम्ही EBLR वर शिफ्ट होऊ शकता का हे नक्की विचारा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: SBI ने MCLR दर किती वाढवला?

    Ans: काही MCLR दरांमध्ये ०.१५ टक्क्यांची वाढ केली आहे.

  • Que: या वाढीचा कोणत्या कर्जदारांना फटका बसेल?

    Ans: SBI च्या MCLR शी जोडलेल्या कर्जदारांवर याचा परिणाम होऊ शकतो.

  • Que: कर्जाचा EMI लगेच वाढणार का?

    Ans: नाही. नवीन दर कर्जाच्या रीसेट कालावधीनुसार लागू होऊ शकतो.

Web Title: Sbi mclr rate hike 2026 loan interest rate emi impact rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • emi
  • Home loan
  • SBI
  • SBI Bank

संबंधित बातम्या

घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! लाखो रुपयांची होणार बचत; ‘या’ 12 सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त Home Loan
1

घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! लाखो रुपयांची होणार बचत; ‘या’ 12 सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त Home Loan

SBI मध्ये नोकरीची भारी संधी, मुंबईत 10 जागांसाठी भरती सुरू
2

SBI मध्ये नोकरीची भारी संधी, मुंबईत 10 जागांसाठी भरती सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.