Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SC-ST विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; Post Matric Scholarship साठी पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा वाढणार?

SC-ST Post Matric Scholarship: एससी-एसटी प्रवर्गातील पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा २.५ लाखांवरून ४.५ लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 04, 2026 | 03:51 PM
post matric scholarship

post matric scholarship

Follow Us
Follow Us:

SC-ST Post Matric Scholarship: देशभर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपबाबत एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी पात्रतेची अट म्हणून पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा गेल्या दशकाहून अधिक काळ बदललेली नाही. आता सरकार ही मर्यादा वाढवण्याच्या विचारात आहे.

उत्पन्न मर्यादेत वाढीचा प्रस्ताव:

सध्या एससी आणि एसटी विद्यार्थ्यांच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा २.५ लाख रुपये आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ही मर्यादा वाढवून ४.५ लाख रुपये प्रतिवर्ष करण्याचा प्रस्ताव आहे.

२०१३ नंतर झालेला नाही बदल:

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय तसेच जनजातीय कार्य मंत्रालयाने शेवटची २०१३ मध्ये या मर्यादेत बदल केला होता. त्यावेळी ही मर्यादा २ लाख रुपयांवरून वाढवून २.५ लाख रुपये करण्यात आली होती. योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दर २ वर्षांनी या आय-मर्यादेची समीक्षा करणे आवश्यक होते, परंतु २०१३ नंतर यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

Non-Teaching Recruitment 2026: आंबेडकर विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

विविध संघटनांची मागणी:

उत्पन्नाची मर्यादा न वाढल्यामुळे अनेक गरजू विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहत असल्याचे सांगत विविध दलित संघटनांनी आणि इंजिनिअर्स असोसिएशनने यामध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. महागाई आणि ‘कन्झ्युमर प्राईस इंडेक्स’ लक्षात घेता ही मर्यादा किमान १२ लाख रुपये करावी, अशी मागणी ‘बॅने’ (BANAE) चे अध्यक्ष नागसेन सोनारे यांनी केली आहे. अनेक संघटनांनी ही मर्यादा ८ लाख रुपये करण्याची मागणीही केली आहे.

Central Secretariat Library: ८.५ लाख पुस्तके धोक्यात! देशातील सर्वात जुनी लायब्ररी ‘या’ प्रोजेक्टमुळे हलवली जाणार!

नवीन बदल कधीपासून लागू होणार?

सतत होणाऱ्या मागण्यांनंतर आता २०२६-२७ या सत्रापासून ही आय-मर्यादा २.५ लाखांवरून ४.५ लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. तथापि, या प्रस्तावाला अंतिम रूप देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक असणार आहे.

Web Title: Sc st post matric scholarship income limit hike 2026 sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • income
  • Scholarship Exam
  • tips for parenting

संबंधित बातम्या

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
1

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.