Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MahaDBT scholarship: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ पदवी अभ्यासक्रमांनाही आता शिष्यवृत्तीचा लाभ; शासनाचा मोठा निर्णय

MahaDBT scholarship 2025-26: राज्य शासनाच्या निर्णयानुसार ॲप्रेंटिसशिप एम्बेडेड पदवी कार्यक्रमांमधील (AEDP) १२४ अभ्यासक्रमांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती आणि वसतिगृह भत्ता योजनेत समावेश करण्यात आला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 18, 2026 | 03:43 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • ‘एईडीपी’ अभ्यासक्रमांनाही आता शिष्यवृत्तीचा लाभ
  • वसतिगृह निर्वाह भत्ता योजना २०२५-२६ पासून लागू
  • पात्र विद्यार्थ्यांना दिलासा
सोनाजी गाढवे, नवराष्ट्र पुणे

MahaDBT scholarship 2025-26: ॲप्रेंटिसशिप एम्बेडेड पदवी कार्यक्रम (एईडीपी) अंतर्गत पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने निर्णय घेतला असून, या अभ्यासक्रमांचा आता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे.

यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १७ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली २४ मार्च २०२६ रोजी झालेल्या सचिवस्तरीय प्रदत्त समितीच्या बैठकीत एईडीपी अभ्यासक्रमांचा या योजनांमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शासनाने आता अधिकृत मान्यता दिली आहे.

महा-डीबीटी पोर्टलवर मॅपिंग करण्याचे निर्देश

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार उच्च शिक्षणात प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि अप्रेंटिसशिपला प्रोत्साहन देण्यासाठी एईडीपी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि पात्र संलग्न महाविद्यालयांमध्ये २०२५-२६ पासून हा कार्यक्रम लागू करण्यात आला आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना महा-डीबीटी पोर्टलवर विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. मात्र, संबंधित योजनांच्या प्रचलित शासन निर्णयांमधील पात्रता अटी, उत्पन्न मर्यादा, जात प्रवर्गनिहाय निकष आणि इतर अटी यापुढेही लागू राहणार आहेत.

QUAD & ASEAN Summit 2026: मनिला येथे जागतिक नेत्यांची मांदियाळी! मोदी-ट्रम्प क्वाड बैठकीत एकत्र; भारतासाठी काय आहे खास?

दरम्यान, मान्यताप्राप्त एईडीपी अभ्यासक्रमांचे महा-डीबीटी पोर्टलवर मॅपिंग करण्याचे निर्देशही शासनाने संबंधित विभागांना दिले आहेत. त्यामुळे अप्रेंटिसशिपसह पदवी शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना आता शिष्यवृत्तीचा आर्थिक आधार मिळणार आहे.

१२४ अभ्यासक्रमांचा शिष्यवृत्ती योजनांमध्ये समावेश

राज्य शासनाने एईडीपीअंतर्गत अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन, हॉटेल व्यवस्थापन, माध्यमशास्त्र, कला, क्रीडा, जैवतंत्रज्ञान, औषधनिर्माण, वस्त्रनिर्मिती आणि विज्ञान शाखांतील एकूण १२४ अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. प्रमुख अभ्यासक्रम

Sumira Tiwari: कौतुकस्पद! कोणतीही क्लास न लावता १८ व्या वर्षी एनडीए परीक्षेत यश; वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली सुमिरा

– बी.टेक. – कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान, संगणक अभियांत्रिकी, डेटा सायन्स
– बी.एस्सी. – सायबर सुरक्षा, जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, अन्नतंत्रज्ञान
– बी.कॉम. – बँकिंग, वित्तीय सेवा, विमा, ई-कॉमर्स
– बीबीए – कार्यक्रम व्यवस्थापन, लॉजिस्टिक्स
– बी.ए. – मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, जनसंवाद
– बी.व्होक. – वाहननिर्मिती, औद्योगिक स्वयंचलन, उत्पादन तंत्रज्ञान
– बी.एस्सी. – हॉटेल व्यवस्थापन, माध्यम संप्रेषण, चित्रपट निर्मिती
– एम.ए. – जर्मन भाषा अभ्यास
– एम.एस्सी. – पर्यावरणशास्त्र
– मास्टर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमांचा शिष्यवृत्तीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'एईडीपी' (AEDP) अभ्यासक्रमांना कोणत्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळणार आहे?

    Ans: एईडीपी अभ्यासक्रमांना आता 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना' आणि 'डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा' लाभ मिळणार आहे.

  • Que: या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे?

    Ans: या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून केली जाणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १७ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

  • Que: या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज कसा करावा लागेल?

    Ans: पात्र विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी (MahaDBT) पोर्टलवर विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

Web Title: Aedp courses scholarship mahadbt maharashtra news marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • course
  • education
  • Scholarship Exam

संबंधित बातम्या

School Admission SOP: खासगी शाळांच्या मनमानीला लगाम! ‘हे’ नियम मोडल्यास होणार कडक कारवाई
1

School Admission SOP: खासगी शाळांच्या मनमानीला लगाम! ‘हे’ नियम मोडल्यास होणार कडक कारवाई

Medical Admission: बुलढाणा नवीन शासकीय महाविद्यालयामुळे चौथ्या फेरीचा फायदा; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार प्रवेश
2

Medical Admission: बुलढाणा नवीन शासकीय महाविद्यालयामुळे चौथ्या फेरीचा फायदा; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार प्रवेश

Maharashtra CET Exam 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनदा होणार CET
3

Maharashtra CET Exam 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनदा होणार CET

NEET UG News: नीट परीक्षा वर्षातून दोनदा होणार? नंदन नीलेकणी यांच्या टास्क फोर्ससमोर आले ‘हे’ महत्त्वाचे प्रस्ताव
4

NEET UG News: नीट परीक्षा वर्षातून दोनदा होणार? नंदन नीलेकणी यांच्या टास्क फोर्ससमोर आले ‘हे’ महत्त्वाचे प्रस्ताव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.