Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहिल्यानगरमध्ये उन्हाळ्यासाठी शाळांचे वेळापत्रक बदलले; ‘या’ वेळेत घेण्यात येणार शाळा

अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे २० मार्चपासून सर्व शाळांचे वेळापत्रक बदलून सकाळी ७ ते दुपारी १२:३० असे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सोई लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 21, 2025 | 10:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

वाढत्या उन्हाच्या झळा लक्षात घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. जिल्हा परिषदेसह सर्व व्यवस्थापनांच्या शाळा आता सकाळच्या सत्रात भरतील, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. हा निर्णय २० मार्च २०२५ पासून लागू होणार असून, उन्हाळी सुटी लागेपर्यंत म्हणजेच १ मेपर्यंत शाळा सकाळी ७ ते दुपारी १२:३० या वेळेत चालतील. या संदर्भातील आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी बुधवारी जारी केले आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सोई लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

HPCL भरतीसाठी परीक्षेचे आयोजन; प्रवेश पत्र करण्यात आले जाहीर

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे ३,५०० आणि इतर व्यवस्थापनांच्या १,५०० अशा एकूण ५,००० शाळा आहेत. या सर्व शाळांना नवीन वेळापत्रकाचे पालन करणे बंधनकारक असेल. मार्च महिन्यात तापमानात मोठी वाढ होते, त्यामुळे दरवर्षी शाळांच्या वेळेत बदल केला जातो. सध्या शाळा सकाळी १०:३० ते सायंकाळी ५ या वेळेत भरतात. परंतु उन्हाळ्यात वाढणारे तापमान, पाण्याची कमतरता आणि उष्णतेमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी सकाळी शाळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामीण भागात उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होतो. तसेच, अनेक शाळा पत्र्याच्या इमारतींमध्ये भरत असल्याने दुपारच्या वेळेस उकाडा वाढतो. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि पालकांकडून शाळांचे वेळापत्रक सकाळच्या सत्रात ठेवण्याची मागणी होत होती. यामुळेच गुरुवारपासून (२० मार्च) जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळी ७ ते दुपारी १२:३० या वेळेत सुरू राहणार आहेत. हा बदल सुमारे ४० दिवस म्हणजे उन्हाळी सुटीपर्यंत कायम असेल.

आगामी काळात विमाः विमा क्षेत्रात करिअर आणि नोकरीच्या संधीतील होणारे बदल, जाणून घ्या.. 

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यासाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार केले आहे. सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर पहिली १० मिनिटे परिपाठासाठी ठेवली जातील, त्यानंतर आठ तासिका पूर्ण केल्या जातील. तसेच, मधली सुटी सकाळी ९:३५ ते १०:१० अशी ३५ मिनिटांची असेल. या बदलामुळे विद्यार्थ्यांना कडक उन्हाचा त्रास कमी होईल आणि शिक्षण प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Web Title: School schedule changed for summer in ahilyanagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 10:03 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • education news

संबंधित बातम्या

Leopard Attack: शेतातून बिबट्या आला अन् 5 वर्षीय चिमुरडीला थेट…; कुठे घडली हृदयद्रावक घटना?
1

Leopard Attack: शेतातून बिबट्या आला अन् 5 वर्षीय चिमुरडीला थेट…; कुठे घडली हृदयद्रावक घटना?

मनपाची थकबाकी वाढता वाढता वाढे…, महिनाभरात ४५ कोटी आणण्याचे अधिकाऱ्यांना आदेश
2

मनपाची थकबाकी वाढता वाढता वाढे…, महिनाभरात ४५ कोटी आणण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

Navi Mumbai : नवी मुंबईत होणार एज्युसिटी; आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहराच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल, ‘ही’ विद्यापीठे भारतात येणार
3

Navi Mumbai : नवी मुंबईत होणार एज्युसिटी; आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहराच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल, ‘ही’ विद्यापीठे भारतात येणार

Ahilyanagar News: पांढरीपूल घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प! खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण
4

Ahilyanagar News: पांढरीपूल घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प! खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.