Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shevgaon News : शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या अवैध गुटखा कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पोलिसांनी ५६,९१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात लाखो रुपयांचा गुटखा साठा असून कारवाई 'मॅनेज' झाल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या दाव्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 03, 2026 | 05:11 PM
शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा

शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा

Follow Us
Follow Us:
  • शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय
  • ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा
  • शेवगावातील गुटखा प्रकरणात आकडेवारीवरून वाद
पोपट पिटेकर, शेवगाव : अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले असले, तरी स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईवर आता शेवगाव शहरात मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शेवगाव येथे नुकत्याच झालेल्या एका अवैध गुटखा विक्रीवरील कारवाईत एलसीबीने दाखवलेला आकडा आणि प्रत्यक्षातील मुद्देमाल यात मोठी तफावत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, राजकीय नेत्यांच्या दबावामुळे ही कारवाई ‘मॅनेज’ करण्यात आल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.

५६ हजारांचाच मुद्देमाल? कारवाई की केवळ ‘खानापूर्ती’?

२ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव-दादेगाव रस्त्यालगत रंजित रवी ढहाळे याच्या राहत्या घराशेजारील खोलीवर छापा टाकला. तेथून संतोष एकनाथ जाधव वय ४६, रा. भगतसिंग चौक, शेवगाव याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून हिरा पान मसाला, रॉयल आणि रत्ना तंबाखू असा एकूण ५६,९१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

जावळी तालुक्यातील दापवडी येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक आक्रमक; शाळेसमोर बस थांब्याची मागणी, मेढा आगार प्रमुखांना निवे

परंतु, शेवगाव शहरातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध गुटख्याचा साठा होता. प्रत्यक्षात कारवाई खूप मोठी आणि लाखो रुपयांची असताना, पोलिसांनी केवळ ५६ हजार ९१२ रुपयांचाच मुद्देमाल दाखवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राजकीय नेत्यांचे फोन आणि पोलिसांचे ‘मॅनेजमेंट’? शहरात सुरू असलेली चर्चा

“कारवाईदरम्यान आणि कारवाईनंतर अनेक बड्या राजकीय नेत्यांचे फोन पोलिसांना आले होते. या राजकीय दबावामुळेच एलसीबीच्या पथकाने नरमाईची भूमिका घेत मोठी कारवाई अत्यंत छोटी करून दाखवली. उर्वरित मालाचे आणि आरोपींचे काय झाले?” असा सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे.

गुन्हेगार पाठीशी घालण्याचा प्रयत्न?

या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ च्या कलम ५९ अन्वये गुन्हा (गु.र.नं. ५५७/२०२६) दाखल करण्यात आला आहे. मात्र, मुख्य सूत्रधार आणि मोठ्या माशांना वाचवण्यासाठीच हा कायदेशीर डावपेच आखण्यात आला का, अशी शंका घेतली जात आहे. एकीकडे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन हे अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी कडक पावले उचलत असताना, दुसरीकडे त्यांचेच ‘एलसीबी’ पथक राजकीय दबावाला बळी पडून कारवाई ‘मॅनेज’ करत असेल, तर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन कसे होणार? असा तिखट सवाल आता शेवगावकर उपस्थित करत आहेत. या प्रकरणी पोलीस अधीक्षक स्वतः लक्ष घालून चौकशी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mumbai High Court: भाजप सरकार मुर्दाबाद म्हटल्याने कोणी तडीपार होत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Web Title: Shevgaon gutkha seizure lcb action under question ahilyanagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra
  • Shevgaon

संबंधित बातम्या

Hingoli Earthquake: गडगडाट अन् जमीन हादरली! हिंगोलीत दोन तासांत दोन भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीती
1

Hingoli Earthquake: गडगडाट अन् जमीन हादरली! हिंगोलीत दोन तासांत दोन भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीती

MBMC Land Deal: टीडीआरमध्ये मोफत मिळालेल्या जागेसाठी २० कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदर महापालिकेवर गंभीर आरोप
2

MBMC Land Deal: टीडीआरमध्ये मोफत मिळालेल्या जागेसाठी २० कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदर महापालिकेवर गंभीर आरोप

Yavatmal News: प्लास्टिक कोटेड कपातून चहा! नियम असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष? महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेत स्पष्ट बंदी
3

Yavatmal News: प्लास्टिक कोटेड कपातून चहा! नियम असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष? महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेत स्पष्ट बंदी

महाराष्ट्राच्या जलसुरक्षेवर उष्णसंकट! कोकण-गोव्यात उष्ण मान्सून हवामान पट्टा वाढला
4

महाराष्ट्राच्या जलसुरक्षेवर उष्णसंकट! कोकण-गोव्यात उष्ण मान्सून हवामान पट्टा वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.