
फोटो सौजन्य - Social Media
उदघाटनानंतर भाष्य करताना अभिनेता व दिग्दर्शक मनिष देसाई म्हणतात की “सायन्स सेंटर हा कल्पकता, मनोरंजन आणि ज्ञानाचा सुंदर मिलाफ आहे. तसेच भविष्यात हे सेंटर ‘मिनी इस्त्रो’ म्हणून ओळखण्यात येईल.” यांनतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाष्य केले. त्यांचे म्हणणे होते की,”या भव्य सायन्स सेंटरमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड नक्कीच वाढवणार आहे. भविष्यातील अनेक वैज्ञानिक, अभियंते, संशोधक येथे घडतील.” अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. (Mira Bhayandar)
या सायन्स सेंटरचे वैशिष्ट्ये
मंत्री सरनाईकांच्या हस्ते उदघाटन सोहळा पार पडलेल्या या सायन्स सेंटरची विशेष गोष्ट म्हणजे येथे मनोरंजनाच्या माध्यमातून विज्ञान शिकवले जाणार आहे. विज्ञानांतील अनेक गुंतागुंतीचे प्रयोग अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून कल्पकतेचा आधार घेऊन ते सोप्या पद्धतीने सादर करण्यात येणार आहे जेणेकरून अतिशय कठीण असणारी गोष्टही विद्यार्थी अगदी सोप्या पद्धतीने समजू शकेल आणि भविष्यात इतरांनाही समजावू शकेल. (Director Mangesh Desai)