Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय ज्ञान परंपरेतील करिअर संधींसाठी पुण्यात चर्चासत्र; ‘या’ तारखेला मिळेल मोफत प्रवेश

पुण्यात १९ जुलै रोजी ‘भारतीय ज्ञान परंपरेतील करिअर संधी’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रातून इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये करिअर कसा करता येईल, यावर मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 16, 2025 | 07:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय ज्ञान परंपरेतील (Indian Knowledge System) करिअर संधींचा मागोवा घेण्यासाठी पुण्यात एक विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात येत आहे. भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टिम आणि भरत नाट्य संशोधन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र शनिवारी, १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ९:४५ ते १०:४५ या वेळेत भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे. या चर्चासत्रासाठी प्रवेश मोफत असून सर्व वयोगटासाठी खुले आहे.

नर्सिंग क्षेत्रात काम करायचे आहे? मेडिकलच्या विद्यार्थ्यांनो! BSc नर्सिंग की GNM? जाणून घ्या

या चर्चासत्रामध्ये इंडियन नॉलेज सिस्टिम म्हणजेच आय.के.एस. मधील करिअर संधी, त्यामागचे तत्त्वज्ञान, शालेय आणि उच्च शिक्षणातील उपयोग, तसेच याचे व्यावसायिक महत्त्व यावर सविस्तर चर्चा होणार आहे. या चर्चासत्रात प्रा. क्षितिज पाटुकले, विवेक वेलणकर, प्रदीप रावत, अभिजित जोग, रवींद्र खरे आणि अभय जबडे हे मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या मते, प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती, गुरुकुल, वेद-उपनिषद यामधून घडणारे विद्यार्थी हे राष्ट्रनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत होते. मात्र आज पाश्चिमात्य शिक्षणामुळे समाज मूल्यहीन, अस्थिर आणि विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशावेळी IKS हीच सकारात्मक पर्याय ठरू शकते, असे मत अनेक अभ्यासकांनी मांडले आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) नुसार IKS आता शाळा, महाविद्यालय, संशोधन संस्था, मीडिया, पर्यटन, लेखन, कॉर्पोरेट ट्रेनिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये सक्रीय होत आहे. मात्र या क्षेत्रात प्रशिक्षित IKS तज्ञांची कमतरता आहे. यासाठीच या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, यामधून शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, संशोधन, परदेशातील करिअर संधी, मीडिया, पर्यटन आदी क्षेत्रांतील संधींवर विचारमंथन होणार आहे. अनेक तद्न्य मंडळी त्यांचे विचार या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकट करणार आहेत.

MBBS होणं पुरेसं नाही! डॉक्टर व्हायचं असल्यास ‘हे’ नियमही पाळा लागतात

या कार्यक्रमामुळे आय.के.एस.मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि मार्गदर्शकांना स्पष्ट दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. अधिक माहितीसाठी भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टिमच्या 7875743405 किंवा 7875191270 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.

Web Title: Seminar in pune on career opportunities in indian knowledge tradition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 07:44 PM

Topics:  

  • Career News

संबंधित बातम्या

दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली महादीप परीक्षा! शिक्षण विभागाचे उत्कृष्ट नियंत्रण
1

दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली महादीप परीक्षा! शिक्षण विभागाचे उत्कृष्ट नियंत्रण

IIM Ranchi ठरले कमिन्स इंडियाच्या ‘रिडिफाइन २०२५’ चे चॅम्पियन! प्रमुख बी-स्कूल केस स्टडी स्पर्धेवर नाव कोरले
2

IIM Ranchi ठरले कमिन्स इंडियाच्या ‘रिडिफाइन २०२५’ चे चॅम्पियन! प्रमुख बी-स्कूल केस स्टडी स्पर्धेवर नाव कोरले

ट्रम्पच्या ‘हेकेखोरगिरीचा’ दिसू लागला परिणाम! अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संख्येत कमालीची घट
3

ट्रम्पच्या ‘हेकेखोरगिरीचा’ दिसू लागला परिणाम! अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संख्येत कमालीची घट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.