फोटो सौजन्य - Social Media
वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याच्या संधीच्या शोधात आहात? मग नर्सिंग करणे अतिशय योग्य ठरेल. पण नर्सिंग करण्यासाठी योग्य कोर्सेस कोणते? BSc नर्सिंग करावे की जनरल नर्सिंग अँड मिडवाइफिरी (GNM) हे जाणून घेणे फार महत्वाचे असते. BSc नर्सिंग या कोर्सला Bachelor of Science in Nursing या नावाने ओळखले जाते. ४ वर्षांच्या असणाऱ्या या कोर्समध्ये उमेदवारांना वैद्यकीय क्षेत्राबद्दल संक्षिप्त रूपात माहिती पुरवण्यात येते. किमान १२वी असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. किमान ४५% ते ५०% गुण असणे आवश्यक आहे.
तसेच GNM म्हणजेच General Nursing and Midwifery पदासाठी ३ वर्षांचा अभ्यास करावा लागतो. कोणत्याही क्षेत्रातून येणारे उमेदवार किमान ४५% ते ५०% HSC गुणांसह GNM मध्ये प्रवेश घेऊ शकतात.
BSc Nursing कोर्स स्ट्रक्चर:
GNM कोर्स स्ट्रक्चर:
जर तुम्ही BSC नर्सिंग या क्षेत्रात काम शिक्षण घेतले तर तुम्ही स्टाफ नर्स (सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात), नर्स एज्युकेटर, OT नर्स, रिसर्च नर्स तसेच पुढील शिक्षण (MSc Nursing, MBA Hospital Management)साठी तयारी करू शकता. तसेच GNM कोर्स केल्यास कम्युनिटी हेल्थ वर्कर, स्टाफ नर्स, ANM Centers, PHCs, NGOs तसेच Maternity Assistant म्हणून कार्य करू शकतात.
पगारामध्ये कोण आहे पुढे?
BSc Nursing केल्यास सुरुवातीचा पगार 25,000 – 40,000 रुपये इतका असेल. पुढे जाऊन पगार 60,000 रुपये ते १,००,००० रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता असते. GNM पदासाठी 15,000 – 25,000 रुपये इतका सुरुवाती पगार असेल. तर तोच पगार पुढे ३५,००० रुपये इतका असेल. चांगले करिअर घडवण्याची BSc नर्सिंग कोर्स करणे कधीही उत्तम ठरेल.






